Ashadhi Ekadashi Wishes Qutoes WhatsApp Status in Marathi : हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला विष्णू देवाला समर्पित असून त्यादिवशी व्रत केलं जातं. महिन्यातील 12 एकादशीपैकी आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी खास महत्त्वाची आणि शुभ मानली जाते. आषाढी एकादशीला भगवान विष्णू योगिनीद्रामध्ये जातात आणि कार्तिक एकादशीला ते निद्रेतून जागे होतात. यंदा आषाढी एकादशी 6 जुलै रविवारी असून कार्तिक एकादशी 1 नोव्हेंबर 2025 ला असणार आहे. आषाढी एकादशीला महाराष्ट्रात मोठा उत्साह असतो. विष्णू भगवानचे रूप विठ्ठलच्या दर्शनासाठी वारकरीसह भक्त मोठ्या प्रमाणात पंढरपुरात गर्दी करतात. राज्यातील विठ्ठल मंदिरात उत्साह असतो. अशा या शुभदिनाच्या आषाढी एकादशीच्या आपल्या प्रियजनांना खास मराठीतून द्या शुभेच्छा.
- तुला साद आली, तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भारावली आषाढी एकादशीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा
- विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत पहाताच होती दंग आज सर्व संत आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
- विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
- सोहळा जमला आषाढी वारीचा, सण आला पंढरीचा, मेळा जमला भक्तगणांचा ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!
- देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई, सुखालाही आला या हो आनंदाचा पूर, चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर, आषाढी एकादशीच्या शुभेच्छा
- सुखासाठी करिसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एकवेळ, मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी! आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- दिसे रिंगण टाळ मृदुंगाची धून रिते तुझे वैकुंठ पांडुरंगा आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
- विठ्ठल विठ्ठल गजर नामाचा हरे चिंता, व्यथा क्षणाधारत… सोड अहंकार सोड तू संसार क्षेम दे विठ्ठला डोळे मिटून .... आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
- अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग.. देवशयनी आषाढी, एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…
- टाळ वाजे, मृदुंग वाजे, वाजे हरीच्या वीणा ! माऊली निघाले पंढरपुरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला..! आषाढी एकादशीच्या शुभेच्छा…!
- तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- जातां पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटतांचि, या सुखा उपमा नाही त्रिभुवनी, पाहिली शोधोनी अवघी तीर्थे… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- तुझा रे आधार मला। तूच रे पाठीराखा।। तूच रे माझ्या पांडुरंगा।। चूका माझ्या देवा। घे रे तुझ्या पोटी।। तुझे नाम ओठी सदा राहो।। आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- आषाढी एकादशीला विठोबाच्या पावलांचा वारकरीचा सण आपल्याला सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो हीच ईश्वराची कृपा आशा करतो! आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
- ह्रदय बंदिखाना केला, आंत विठ्ठल कोंडीला…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- तुमचिये दासीचा दास करूनि ठेवा, आर्शिवाद द्यावा हाचि मज…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा