Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस हे देखील शनिवारी पंढरपुरात शासकीय महापूजेसाठी दाखल झाले होते. पहाटे 2.20 वाजता मुख्यमंत्र्यांच्या आणि मानाच्या वारकऱ्यांनी विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. महापूजा केल्यानंतर मुख्यमंत्री विठ्ठलाकडे शेतकऱ्यांचं आणि महाराष्ट्राच चांगलं कर अशी प्रार्थना केली असल्याचं म्हटलं.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, आज आपल्या सर्वांच्या जीवनातील आनंदाचा क्षण आहे. एकादशी निमित्ताने पांडुरंगाचे दर्शन घेणं ही भाग्याची गोष्ट आहे. कुठलीही तमा न बाळगता वारीची परंपरा सुरु आहे. जुलमी राजवट असो इंग्रज काळ असो ही परंपरा कायम आहे. सर्व वारकऱ्यांमध्ये युवा पिढीचा मोठा सहभाग आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी चांगले काम आणि वारीमध्ये व्यवस्था केली आहे.
यावर्षी पंढरपूर आषाढी वारीमध्ये स्वच्छ असल्याच दिसलं. निर्मळ आणि पर्वावरण पूरक यंदाची आषाढी वारी झाली आहे. संतांनी दिलेला संदेश यंदा वारीमध्ये अनुभवायला मिळाला. प्रत्येक व्यक्ती हा दुसऱ्या व्यक्तीमध्ये पांडुरंग पाहत असतो. त्यामुळे जेव्हा वैष्णवांचा मेळा निघतो तेव्हा असीम ऊर्जा पंतयार होते.
पंढरपुरात विठूरायाचे VIP दर्शन बंद
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले विठ्ठलाचे VIP दर्शन वर पालकमंत्र्यांनी निर्बंध आणल्यामुळे वारकरी दर्शन कालावधी पाच तासांनी कमी झाला आहे. या VIP दर्शनामुळे काही वारकरी मोठी रांग बघून मूक-दर्शन करतात. तर काही वारकरी हे कळस दर्शन घेऊन माघारी फिरतात. त्यामुळे आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
LIVE | शासकीय महापूजेचे मानकरी असलेल्या वारकरी दाम्पत्याचा सन्मान
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 5, 2025
पहाटे ३.५९ वा. | ६-७-२०२५ पंढरपूर@fadnavis_amruta#Maharashtra #Pandharpur #AshadhiEkadashi https://t.co/KoCGXJeszj
मी आपल्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आजचे मानाचे वारकरी जे आहेत त्यांनाही शुभेच्छा देतो आणि त्यांना पांडुरंगाचा आशीर्वाद मिळाला. त्यांची भक्ती फुलत राहो अशा प्रकारची पांडुरंगाचे चरणी प्रार्थना करतो आणि खऱ्या अर्थानं पांडुरंग आपल्या सर्वांना आपल्या मनातलं ओळखणारा आहे. त्यामुळे विठ्ठलाने आपल्याला महाराष्ट्रावरचे सर्व संकटं दूर करण्याची शक्ती ही पांडुरंगाने आपल्याला द्यावी. विशेषता आपल्या बळीराजाला समाधानी करण्याकरता या ठिकाणी पांडुरंगाने आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची पांडुरंगाच्या चरणी मी प्रार्थना करतो.