Marathi News> आषाढी एकादशी
Advertisement
LIVE NOW

Ashadhi Ekadashi 2025 LIVE: फडणवीसांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची महापूजा, उगले दाम्पत्य ठरलं मानाचं वारकरी

Ashadhi Ekadashi 2025 LIVE Updates: संपूर्ण पंढरपूर शहर भक्तिभावाने नटलेलं असून आषाढी एकादशीचा आनंद सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. संतांच्या पालख्या इंद्रायणीच्या काठावर विसावल्या असून, विठ्ठल भक्तांच्या उपस्थितीनं पंढरपूर नगरी विठूमय झाली आहे. विठुरायाच्या महापूजेपासून ते आषाढी वारीमधील प्रत्येक अपडेट पाहा फक्त एका क्लिकवर

Ashadhi Ekadashi 2025 LIVE: फडणवीसांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची महापूजा, उगले दाम्पत्य ठरलं मानाचं वारकरी
LIVE Blog

Ashadhi Ekadashi Celebration in Maharshtra LIVE News: संपूर्ण पंढरपूर शहर भक्तिभावाने नटलेलं असून आषाढी एकादशीचा आनंद सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. संतांच्या पालख्या इंद्रायणीच्या काठावर विसावल्या असून, विठ्ठल भक्तांच्या उपस्थितीनं पंढरपूर नगरी विठूमय झाली आहे. विठुरायाच्या महापूजेपासून ते आषाढी वारीमधील प्रत्येक अपडेट पाहा फक्त एका क्लिकवर

06 July 2025
06 July 2025 06:01 AM

कलाशिक्षक सुनिल दाभाडेंनी रेखाटले चक्क मोराच्या पिसावर विठूरायाचे चित्र 

जळगावात मानव सेवा विद्यालयाचे कलाशिक्षक सुनिल दाभाडे यांनी चक्क मोराच्या पिसावर विठूरायाचे चित्र रेखाटले आहे. सुनील दाभाडे यांनी आषाढी एकादशी निमित्त कलरच्या साहाय्याने विठूरायाचे चित्र रेखाटले आहे. मोराच्या पिसावर विठुरायाचे चित्र साकारण्यासाठी सुनील दाभाडे यांना केवळ 15 मिनिट लागले. शिक्षक सुनील दाभाडे यांनी अनोख्या पद्धतीने विठुरायाला नमन केलं करत आषाढी एकादशी साजरी केली आहे. याआधी सुनील दाभाडे यांनी तुळशीचा पानांवर व विटेवर ही विठूमाऊलीचे सुरेख चित्र रेखाटले होते. विटेवरील पेटींग पंढरपूर ला मंदिरात ठेवण्यात आले आहे.

06 July 2025 05:57 AM

तुळशीच्या पानावर चिमुकल्याने साकरला विठ्ठल..

सांगलीची एका चिमुकल्याने चक्क तुळशीच्या पानावर विठ्ठलाची प्रतिकृती साकारली आहे.इस्लामपूर येथील इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या आरव अरविंद कोळी याने आषाढी एकादशीच्या निमित्ताने फक्त 2.5 सेमी x 3 सेमी आकाराच्या तुळशीच्या पानावर ॲक्रेलिक रंगांचा वापर करून विठ्ठलाचे आकर्षक चित्र रेखाटले आहे. या चित्रकलेसाठी आरव यास अर्ध्या तासाचा कालावधी लागला. लहान व नाजूक पानावर इतक्या सुंदर आणि सूक्ष्म रेखाटन करणे ही कौशल्याची बाब असून, आरवच्या या कलेचे सर्वत्र कौतुक होत आहे.आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलावरची भक्ती आणि चित्रकलेची आवड यांचा सुंदर संगम आरवने कृतीतून साधला आहे.

06 July 2025 05:27 AM

Ashadhi Ekadashi 2025: बळीराजाला सुखी करण्याची शक्ती द्यावी, मुख्यमंत्र्यांचे विठूरायाकडे साकडे

06 July 2025 05:25 AM

Ashadhi Ekadashi Celebration in Maharshtra LIVE News: आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांकडून श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार प्रदान

06 July 2025 04:15 AM

Ashadhi Ekadashi Celebration in Maharshtra LIVE News: आपल्या महाराष्ट्राचे आणि बळीराजाचे भले व्हावे हेच विठ्ठलाच्या चरणी साकडं!

06 July 2025 03:32 AM

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची महापूजा संपन्न

विठ्ठलाची महापूजा संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री आपल्या कुटुंब आणि मानाचे वारकरी उगले दाम्पत्यासह रुक्मिणी मातेच्या दर्शनाला गेले. इथं रुक्मिणी मातेला दुग्धाभिषेक घालून मुख्यमंत्री फडणवीस आणि उगले दाम्पत्यांनी पूजा केली. 

06 July 2025 03:23 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत विठ्ठलाची महापूजा करण्याचा मान नाशिकच्या दाम्पत्याला

06 July 2025 02:43 AM

Ashadhi Ekadashi Celebration in Maharshtra LIVE News: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा 

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महापूजा केली आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजा देखील उपस्थित आहेत.

06 July 2025 02:31 AM

Ashadhi Ekadashi Celebration in Maharshtra LIVE News: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाच्या महापूजेला सुरुवात 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाच्या महापूजेला सुरुवात झाली आहे. यंदा विठ्ठलाच्या पूजेसाठी मानाचा वारकरी नाशिक जिल्ह्यातील उगले दाम्पत यांना मिळाला आहे. 

06 July 2025 02:26 AM

Ashadhi Ekadashi Celebration in Maharshtra LIVE News: यंदा नाशिक जिल्ह्यातील उगले दामपत्याला विठुराच्या पूजेचा मान 

विठ्ठलाच्या पूजेसाठी मानाचा वारकरी यंदा नाशिक जिल्ह्यातील उगले दाम्पत यांना मिळाला आहे. 

06 July 2025 02:21 AM

Ashadhi Ekadashi Celebration in Maharshtra LIVE News: मुख्यमंत्री महापूजेसाठी विठ्ठल मंदिरात दाखल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात महापूजेसाठी सहकुटुंब दाखल झाले आहेत. त्यासोबत लाखो भाविक देखील आज पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात महापूजेला सुरुवात होणार आहे. 

06 July 2025 02:15 AM

Ashadhi Ekadashi Celebration in Maharshtra LIVE News: शासकीय निवासस्थानावरून मुख्यमंत्री महापूजेसाठी रवाना

विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शासकीय निवासस्थानावरून विठ्ठल मंदिराकडे रवाना झाले आहेत.  

06 July 2025 01:59 AM

Ashadhi Ekadashi Celebration in Maharshtra LIVE News: वडाळा विठ्ठल मंदिरात एकनाथ शिंदेंच्या हस्ते पहाटे पूजा

आषाढी एकादशीच्या निमित्त वडाळा येथील विठ्ठल मंदिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महापूजा पार पडणार आहे. 

06 July 2025 01:54 AM

Ashadhi Ekadashi Celebration in Maharshtra LIVE News: पंढरपूरनगरी भाविकांनी सजली

चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील 65 एकर जागा भाविकांनी सजलीय. शहरातील मठ,धर्मशाळा या ठिकाणी भाविक मुक्कामी आहेत. तसंच रस्त्याकडेला राहुट्या, तंबू टाकून भाविक भजन, कीर्तन, हरिनामाचा जयघोष कानी पडत आहे. मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे.चंद्रभागा नदी, वाळवंट भाविकांची गर्दी दिसून येत आहे. नदीचे स्नान,भटक पुंडलिक मंदिराचे दर्शन घेवून भाविक दर्शन रांगेत उभा आहे.

06 July 2025 01:52 AM

आषाढी एकदशीच्या दिवशी तुळशीची पूजा केल्यास होईल इच्छापूर्ती

आषाढी एकदशीच्या दिवशी तुळशीची पूजा केल्यास होईल इच्छापूर्ती#Maharashtra #Pandharpur #AshadhiEkadashi #tulsi https://t.co/KKY39XAglX

06 July 2025 01:15 AM

Ashadhi Ekadashi Celebration in Maharshtra LIVE News: मुख्यमंत्री कुटुंबासह विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी पंढरपुरात दाखल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि यांचे कुटुंब आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी पंढरपुरात दाखल झाले. याप्रसंगी वारकरी संप्रदायातर्फे मुख्यमंत्री फडणवीस आणि कुटुंबियांचे स्वागत करण्यात आले. 

06 July 2025 01:08 AM

Ashadhi Ekadashi Celebration in Maharshtra LIVE News: महापूजा सोहळा पहाटे 2. 30 वाजता सुरु होणार

एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मानाचे वारकरी आणि 10 मानाच्या पालखी सोहळा प्रमुखांसह मुख्यमंत्री महापूजा करणार आहेत. हा सोहळा पहाटे 2.30 वाजता सुरु होणार आहे. 

 

06 July 2025 01:04 AM

Ashadhi Ekadashi Celebration in Maharshtra LIVE News: आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल भक्तांना पाठवा 'हे ' खास शुभेच्छा संदेश

आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल भक्तांना पाठवा 'हे ' खास शुभेच्छा संदेश, फोटो, Whatsapp Status अन् विठुरायाचा भक्तीत तल्लीन व्हा

06 July 2025 01:01 AM

Ashadhi Ekadashi Celebration in Maharshtra LIVE News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नवी पॉडकास्ट मालिका

एक नवी सुरुवात करतोय. 'महाराष्ट्रधर्म' ही नवी पॉडकास्ट मालिका आणि नवे काही सुरू करण्यासाठी आषाढी एकादशीपेक्षा दुसरा कोणता पवित्र दिवस असेल? पाहायला विसरू नका आज, रविवारी दि. 6 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता माझ्या सर्व समाजमाध्यमांवर!

06 July 2025 00:53 AM

Ashadhi Ekadashi Celebration in Maharshtra LIVE News: पंढरपुरात उभारणार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं सांस्कृतिक भवन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंढरपुरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन करण्यात आलं आहे. 

06 July 2025 00:44 AM

Ashadhi Ekadashi Celebration in Maharshtra LIVE News: पंढरपुरात मुख्यमंत्र्‍यांच्या हस्ते विविध सेवांचे उद्घाटन

06 July 2025 00:33 AM

‘पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी’ या पर्यावरणविषयक जनजागृती उपक्रम

 

06 July 2025 00:14 AM

पंढरपुरात मुख्यमंत्र्यांनी खेळली फुगडी, सांस्कृतिक काार्यक्रमांनाही लावली हजेरी 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कुटुंबासह पंढरपूर येथील भगवान विठ्ठलाच्या वार्षिक यात्रेनिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात हजेरी लावली. त्यांनी त्यांच्या कुटुंबासह 'फुगडी' खेळण्याचा आनंद वारीमध्ये लुटला. 

Read More