Marathi News> ब्लॉग
Advertisement
LIVE NOW

Maharashtra Breaking News Today 27 June LIVE Updates: हिंदी सक्ती विरोधातील मोर्चाला पवारांच्या राष्ट्रवादीचा जाहीर पाठींबा

Maharashtra Breaking News Today 27 June LIVE Updates: दिवसभरात घडणाऱ्या राज्यातील आणि देशातील महत्त्वाची शहरं आणि गावातील ताज्या बातम्या, राजकीय बातम्या, मनोरंजन, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील सर्व महत्त्वाचे अपडेट्स एक क्लिकवर जाणून घ्या.

Maharashtra Breaking News Today 27 June LIVE Updates: हिंदी सक्ती विरोधातील मोर्चाला पवारांच्या राष्ट्रवादीचा जाहीर पाठींबा
LIVE Blog

Maharashtra Breaking News Today 27 June LIVE Updates: दिवसभरात घडणाऱ्या राज्यातील आणि देशातील महत्त्वाची शहरं आणि गावातील ताज्या बातम्या, राजकीय बातम्या, मनोरंजन, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील सर्व महत्त्वाचे अपडेट्स एक क्लिकवर जाणून घ्या.

27 June 2025
27 June 2025 21:02 PM

हिंदी सक्ती विरोधातील मोर्चाला पवारांच्या राष्ट्रवादीचा जाहीर पाठींबा

राज्य सरकार महाराष्ट्रातजी हिंदी सक्ती लादू इच्छित आहे त्याविरोधात दिनांक 5 जुलै 2025 रोजी मुंबईतील गिरगाव चौपाटीवरून मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. प्रत्येक मराठी माणसाने या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन मी करत आहे. 

कुणाचाही विविध भाषा शिकण्याला किंबहुना हिंदी भाषेलाही विरोध नाही. पण इयत्ता पहिलीपासूनचं प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून व्हावं असा आग्रह आहे. जो योग्य आहे आणि 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार' पक्ष म्हणून आमचीही हीच भूमिका आहे. शैक्षणिक धोरणाच्या त्रिभाषा सूत्राआडून मातृभाषेला डावलण्यासाठी प्रयत्न होत असतील तर मराठी माणूस एकदिलाने त्याचा विरोध करणार. 

महाराष्ट्र हिताचा प्रश्न उभा राहतो तेव्हा महाराष्ट्रासाठी आणि जेव्हा राष्ट्रहिताचा प्रश्न उभा राहतो तेव्हा राष्ट्रासाठी पक्षीय भेदाभेद बाजूला सारून उभं राहणं हेच 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार' पक्षाचं स्पष्ट धोरण आहे.

 

27 June 2025 19:55 PM

राज्यभरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

51 IPS अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 

27 June 2025 18:57 PM

'दीडशे कोटींची जमीन गिफ्ट मिळाली'; संदीपान भुमरेंच्या चालकाचा खुलासा

दरम्यान दीडशे कोटींची जमीन गिफ्ट मिळाल्याचा दावा संदीपान भुमरेंच्या चालकानं म्हटलंय.. जमिनिशी भुमरे पिता-पुत्राचा संबंध नसल्याचा दावाही त्यांनी केलाय. सालारजंग कुटुंबीयांचे आणि वडिलांचे 20-25 वर्ष संबंध असल्यानं त्यांनी जमीन दिल्याचा दावा भुमरे यांचे ड्रायव्हर जावेद शेख यांनी केलाय.

27 June 2025 18:41 PM

ना नासा, ना इस्रो; मग अंतराळात गेलेल्या शुभांशू शुक्लांना कोण, किती देणार मानधन? 99 टक्के लोकांना नसेल माहिती!

27 June 2025 18:35 PM

'मॅचआधी मिळाली धमकी, जीवाला धोका...'; पाकिस्तान विरुद्ध सामन्यापूर्वी टीम इंडिया हॉटेलमध्ये बंद, रोहित शर्माचा खुलासा

27 June 2025 18:01 PM

मातृभाषेचा अपमान सहन करणार नाही; हिंदी सक्तीवरून उद्धव ठाकरेंचे सरकारला आव्हान

मराठी अभ्यास केंद्र / शालेय शिक्षण अभ्यास व कृती समन्वय समिती यांच्या आंदोलनाच्या पाठीशी शिवसेना आहे. उद्धव ठाकरेंचा आज प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे आदेश देत म्हणाले की 'मातृभाषेचा अपमान सहन करणार नाही. भाषेला विरोध नाही, सक्तीला विरोध आहे. हिंदी सक्तीविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात पूर्ण ताकदीने आंदोलन करा. रविवार दिनांक 29 जून रोजी दुपारी 3 वाजता सर्वत्र हिंदी सक्ती GR ची होळी करण्याचे आदेश. प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक शहरात, तालुक्यात, शाखेत आंदोलन करा. महाराष्ट्र धर्मासाठी सर्वांनी अहंकार बाजूला ठेवून एकत्र यायला हवं. तुम्हीही स्थानिक पातळीवर सर्वांना सोबत घेऊन काम करा. येत्या रविवारी GR ची होळी करून मराठी माणसाची ताकद सर्वांना दाखवा.'

27 June 2025 17:52 PM
27 June 2025 17:48 PM

'मला धारावीतच घर पाहिजे', झोपडपट्टीधारकांनी आदित्य ठाकरेंकडे मांडली व्यथा

अपात्र धारावी झोपडपट्टी धारक आदित्य ठाकरेंच्या भेटीला आले आहेत. 'मी धारावीकर, मला धारावीतच घर पाहिजे', असं झोपडपट्टीधारक म्हणाले आहेत. 

27 June 2025 16:42 PM

कॉंग्रेसला धुळ्यातून मोठा धक्का! 

काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष, धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री जयकुमार रावल यांची दोंडाईचा येथील रावल गढीवर जावून भेट घेतली. या भेटीत भाजप प्रवेश बाबत चर्चा झाली असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले आहे. तर यामुळे खानदेशात काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.

27 June 2025 16:06 PM

Hindi Language Row : राज ठाकरेंना कृती समितीकडून 29 जूनच्या सभेसाठी निमंत्रण

हिंदीच्या मुद्द्यावर शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समितीनं सभेचं आयोजन केलं आहे. या सभेसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कृती समितीन पत्राद्वारे आमंत्रण दिलं आहे. 29 जून रोजी ही सभा होणार आहे. मुंबईत मराठी पत्रकार संघात ही सभा होणार आहे. यावेळी शासन निर्णय आणि परिपत्रकाची प्रतीकात्मक होळी केली जाणार आहे. त्यानंतर जाहीर सभा होणार आहे.मराठी अभ्यास केंद्र आणि समिवचारी संस्थांच्या पुढाकारानं, हिंदी भाषेच्या मुद्द्यावर शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. 

27 June 2025 15:31 PM

हॉटेलातील 3 घरगुती सिलेंडर गॅसला अचानक लागली आग

बीड शहरातील पोलीस पेट्रोल पंपासमोरील एका गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन मोठा भडका उडाला. दुपारी हॉटेलातील 3 घरगुती सिलेंडर गॅसना अचानक आग लागली. यात एका टाकीचा भीषण स्फोट झाला. यावेळी हॉटेलमध्ये कोणीही ग्राहक नसल्यानं मोठी जीवितहानी टळली. अग्निशामक दलानं तातडीनं आग आटोक्यात आणली. या दुर्घटनेपासून अवघ्या शंभर फुटाच्या अंतरावर पेट्रोल पंप होते. दरम्यान हॉटलात घरगुती सिलेंडर गॅस आढळल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. 

27 June 2025 14:16 PM

हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधूंचा एकत्र मोर्चा निघणार आहे. त्यानिमित्तानं वरुण सरदेसाई आणि संदीप देशपांडे हे एकत्र आल्याचे समोर आले आहे. 

27 June 2025 14:14 PM

डोंबिवलीपाठोपाठ दिव्यातही भाजपला धक्का

हिंदीच्या मुद्यावरुन भाजपमध्येही नाराजी व्यक्त केली. दिवामधील भाजप पदाधिकाऱ्याचा राजीनामा. रविराज बोटले यांचा पदाचा राजीनामा दिला आहे. डोंबिवलीपाठोपाठ दिव्यातही भाजपला धक्का. काल माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे आणि माजी नगरसेविका कविता म्हात्रे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे.यानंतर दिव्यातील भाजप पदाधिकारी ॲड. रविराज दिवाकर बोटले यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत सोडचिठ्ठी दिली.

27 June 2025 14:11 PM

ठाकरेंना आपण ओळखत नसल्याचं आशा भोसलेंचं धक्कादायक विधान 

मंगेशकर कुटुंब आणि ठाकरे कुटुंब यांचे कौटुंबिक संबंध किती जिव्हाळ्याचे आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहेत. असं असताना आशा भोसले यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे भावांच्या एकत्रिकरणावर बोलणं टाळलंय. हे कमी की काय त्यांनी ठाकरेंना आपण ओळखत नसल्याचं धक्कादायक विधान केलंय. राजकारणात मी फक्त आशिष शेलार यांना ओळखते बाकी कोणालाही ओळखत नसल्याची प्रतिक्रिया आशा भोसले यांनी दिली. आशा भोसलेंच्या या प्रतिक्रियेमुळे राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त होतंय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या राजकारणावर आपल्याला बोलायचं नाही असं आशाताई सांगू शकत होत्या. इतकंच नाही तर आधी राज ठाकरे मित्र असल्याचं आशा भोसलेंनी मराठी दिनाच्या कार्यक्रमाला म्हटलं होतं पण त्यांनी थेट ठाकरेंना ओळखच दाखवायला नकार दिलाय. पाहुया आशा भोसलेंनी नक्की प्रतिक्रिया काय दिलीय...
 

27 June 2025 13:04 PM

मराठीसाठी जेलमध्ये जायची तयारी - संदीप देशपांडे

मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनीही पत्रकार परिषद घेऊन मोर्चामधून मराठी माणसाची ताकद दिसेल असं वक्तव्य केलंय. इतकच नाही तर राज-उद्धव ठाकरेंचा एकच एकत्र मोर्चा असेल असं राऊतांनी केलेलं ट्विट देशपांडे यांनी रि-ट्विट केलंय. 'मोर्चा महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारा. यापुढे मराठी माणसाच्या वाटेला कुणीही जाणार नाही. सरकारची समजून न उमजण्याची भूमिका. मोर्चामधून मराठी माणसाची ताकद दिसेल. तर मराठीसाठी जेलमध्ये जायची तयारी आहे', असं देखील ते यावेळी म्हणाले.

27 June 2025 13:03 PM

​हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधूंचा एकत्र मोर्चा

हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधूंचा एकत्र मोर्चा निघणार आहे. खासदार संजय राऊतांकडून ट्विटरवर घोषणा करण्यात आली आहे. उद्धव आणि राज ठाकरेंचा एकत्र फोटो शेअर करत राऊतांनी ही घोषणा केली. त्यामुळे हिंदी सक्तीविरोधात 5 जुलैला ठाकरे बंधू एकत्र मोर्चात दिसणार का याकडं लक्ष लागलंय. या ट्विटनंतर काही वेळात राऊतांनी आणखी एक ट्विट केलं. ठाकरे हाच ब्रँड असं म्हणत राऊतांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना डिवचलं. यानिमित्ताने ठाकरे बंधूंच्या युतीचं पहिलं पाऊल पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय.

27 June 2025 12:31 PM

शेतातून 400 किलो डाळिंबांच्या चोरीची घटना 

शिरुर तालुक्यात शेतकऱ्याच्या शेतातून 400 किलो डाळिंबांच्या चोरीची घटना घडलीय. डाळिंब चोरीला गेल्यानं शेतक-याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. बदलत्या हवामानामुळे शेतकरी आधीच चिंते असताना डाळिंब चोरीच्या घटनांमुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय. त्यामुळे शेतक-यांच्या पिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.

27 June 2025 11:36 AM

'सरळसरळ डिझाईन कॉपी करून..', प्राडा ब्रँडने कोल्हापुरी चपलेली नक्कल केल्याने संभाजीराजे छत्रपतींचा संताप, 'अशा कंपन्यांना..'

27 June 2025 11:35 AM

'मला राज ठाकरेंचा फोन आला...', संजय राऊतांकडून मोठा खुलासा, 'मी उद्धव ठाकरेंना सांगताच त्यांनी...'

27 June 2025 11:13 AM

Maharashtra Breaking News LIVE Updates: जागेच्या वादातून संदीपान भुमरे अडचणीत येण्याची शक्यता

ागेच्या वादातून संभाजीनगरमध्ये शिवसेनेचा आणखी एक नेता अडचणीत येण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे माजी राज्यमंत्री संदीपान भुमरे आणि त्यांचा मुलगा आमदार विलास देशमुख  जमीनीच्या वादातून अडचणीत येण्याची शक्यता आहे. संदीपान भुमरे यांच्या चालकाच्या नावावर कोट्यवधींची जमीन मिळाल्याबद्दल आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू केलये. परभणीतील एका वकिलाने दाखल केलेल्या तक्रारीवरुन ही चौकशी सुरु करण्यात आलीये. यात भुमरेंचा चालक रसूल शेख याच्यासह संदीपान भुमरे आणि विलास भुमरे यांचंही नाव आहे.

27 June 2025 11:12 AM

Maharashtra Breaking News LIVE Updates: देहूतील 150 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला ब्रिटिश कालीन पूल वाहतुकीस बंद करण्यात आलाय. हा पूल जुना झाल्यानं याठिकाणी कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी ही पूल बंद करण्यात आलाय. याठिकाणी प्रवेश बंद असल्याचं सूचना फलक लावण्यात आलेत.

27 June 2025 11:12 AM

Maharashtra Breaking News LIVE Updates: कुणी सांगतो म्हणून मोर्चात सहभागी होता येत नाही. मनसेचं धोरण समजून घेऊन मोर्चात सहभागी होऊ, राज ठाकरेंच्या मोर्चाबाबत शरद पवारांचं वक्तव्य

27 June 2025 10:39 AM

Maharashtra Breaking News LIVE Updates: आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा मोर्चाची घोषणा केली तेव्हा मोर्चा काढलाच. परवानगी नाही मिळाली तर केसेस अंगावर घेण्याची जेलमध्ये जाण्याची तयारी आहे, असंही संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

27 June 2025 10:32 AM

Maharashtra Breaking News LIVE Updates: 'मोर्चा महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलवणारा ठरेल'

राज ठाकरेंनी काल पुढाकार घेऊन संजय राऊतांशी चर्चा केली. सर्वानुमते ५ जूलै ही मोर्चाची तारीख निश्चित करण्यात आलीय. सर्व राजकीय पक्ष; साहित्यिक, मराठी माणूस या मोर्चात एकत्र येतील. मोर्चा महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलवणारा ठरेल, असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. 

27 June 2025 09:38 AM

झिशान सिद्दीकी यांचा पाठलाग करणाऱ्यांना पोलिसांनी सोडून दिलं

झिशान सिद्दीकी यांचा पाठलाग करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सोडून दिलं आहे. आर्थिक नुकसान झाल्याने मदतीसाठी झिशान सिद्दीकी यांना भेटण्याचा ते प्रयत्न करत होते. दोघेही तरुण ग्रामीण भागातले असून त्यांच्या चौकशीत काहीही संशयास्पद आढळले नाही. झिशान सिद्दीकी यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर तीन ते चार तास दोघेही उभे होते. त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र काहीही संशयास्पद आढळले नाहीत. निर्मलनगर पोलीस आणि गुन्हे शाखेनेही केली दोघांची चौकशी केली आहे. 

27 June 2025 09:36 AM

राज ठाकरेंच्या मोर्चात सहभागी होणार का? शरद पवार स्पष्टच बोलले, 'कोणीही सांगतं म्हणून उठून...'

27 June 2025 09:34 AM

'एकच आणि एकत्र....', राज आणि उद्धव ठाकरेंचा फोटो पोस्ट करत संजय राऊतांची मोठी घोषणा, महाराष्ट्रभर चर्चा

27 June 2025 09:08 AM

 मराठीच्या मुद्दयावर एकच मोर्चा निघणार? ठाकरे बंधू मोर्च्यात एकत्र दिसणार?  

हिंदी भाषा सक्तीविरोधात मुंबईत दोन मोर्चे काढले जाणार आहेत. राज ठाकरेंकडून 5 जुलैला मोर्चाची घोषणा करण्यात आलीय. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी 7 जुलैच्या मोर्चाला पाठिंबा दिलाय.. मात्र मराठीच्या मुद्दयावर एकच मोर्चा निघणार का? असा प्रश्न आता विचारला जात आहे. एकच मोर्चा काढण्यासाठी मनसे आग्रही आहे. मात्र तारीख आधीच ठरल्यानं कृती समितीचीही पंचाईत झाली आहे. आता निर्णयात बदल करायचा असल्यास सर्वांना विश्वासात घेऊन ते करता येईल अशी भूमिका, कृती समितीचे डॉक्टर दीपक पवार यांनी मांडली आहे. 

27 June 2025 09:08 AM

 मराठीच्या मुद्दयावर एकच मोर्चा निघणार? ठाकरे बंधू मोर्च्यात एकत्र दिसणार?  

हिंदी भाषा सक्तीविरोधात मुंबईत दोन मोर्चे काढले जाणार आहेत. राज ठाकरेंकडून 5 जुलैला मोर्चाची घोषणा करण्यात आलीय. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी 7 जुलैच्या मोर्चाला पाठिंबा दिलाय.. मात्र मराठीच्या मुद्दयावर एकच मोर्चा निघणार का? असा प्रश्न आता विचारला जात आहे. एकच मोर्चा काढण्यासाठी मनसे आग्रही आहे. मात्र तारीख आधीच ठरल्यानं कृती समितीचीही पंचाईत झाली आहे. आता निर्णयात बदल करायचा असल्यास सर्वांना विश्वासात घेऊन ते करता येईल अशी भूमिका, कृती समितीचे डॉक्टर दीपक पवार यांनी मांडली आहे. 

27 June 2025 08:31 AM

पालिकेच्या हिंदी शाळांमधले 47% विद्यार्थी घटले

पालिकेच्या हिंदी शाळांमधले 47% विद्यार्थी घटले...13 वर्षात हिंदीच्या 19 शाळा बंद.शिक्षकांच्याही संख्येत घट.... माहिती अधिकारातून हिंदी शाळांचं वास्तव समोर

27 June 2025 08:12 AM

मध्य रेल्वेची लोकलसेवा कोलमडण्याची शक्यता

मध्य रेल्वेची लोकलसेवा कोलमडण्याची शक्यता...मध्य रेल्वेचे मोटरमन आंदोलनाच्या पवित्र्यात....बायोमेट्रिक हजेरीला मोटरमनचा विरोध

27 June 2025 08:11 AM

मुंबईत जोरदार तर विदर्भ, मराठवाडा, घाटमाथ्यावर मुसळधार! खान्देशातही झाले आगमन, अनेक ठिकाणी अलर्ट  

 

27 June 2025 08:02 AM

मराठी-हिंदी वादावर भाजपाने आखली रणनिती, राज-उद्धव यांच्या विरोधाला मोदींच्या नावे देणार उत्तर; वर्षावरील बैठकीत निर्णय

27 June 2025 08:01 AM

‘लोणी’ सत्तेच्या उकळीने बहुधा करपले आहे', सामनातून लोणीकरांवर टीकास्त्र, मोदींनाही टोला 'ट्रम्प यांच्यापुढे शेपूट घालणारे...'

27 June 2025 07:26 AM

अकरावीची पहिली यादी आता थेट सोमवारी

अकरावी प्रवेशाची ऑनलाईन पहिली यादी आता थेट सोमवारी जाहीर होणार आहे. नियोजित वेळापत्रकानुसार आज पहिली यादी प्रसिद्ध होणार होती. मात्र ऑनलाईन सॉफ्टवेअर मधील तांत्रिक अडचणींमुळे कॉलेजांची कट ऑफ लिस्ट दिसत नसल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली आहे. यामुळे 12 लाख विद्यार्थी ऑनलाईन प्रवेश निश्चितीच्या प्रतीक्षेत आहेत. विशेष म्हणजे प्रवेशाची यादी पुढे ढकलली जाणार ही बातमी झी २४ तासनेच सर्वप्रथम दिली होती. आतापर्यंत अल्पसंख्याक कॉलेजांमधील आरक्षण कोटा कोर्टाच्या निर्देशानुसार रद्द केल्यानं, ऑनलाईन सॉफ्टवेअर पुन्हा अपडेट करावं लागलं. त्यामुळेच पहिली यादी प्रसिद्ध करायला उशीर होतोय.

27 June 2025 07:24 AM

 मराठी - हिंदी वादावर भाजपनेही आखली रणनीती 

- भाषीय वादाचे राजकारण  हाणून पाडणार

- महाराष्ट्र भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत भाषीय वादावर चर्चा

- आरोप प्रत्यारोपापेक्षा मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याचा प्रचार करण्याचा निर्णय 
 
- मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच झाल्याचे भाजप लोकांपर्यत पोहोचवणार

27 June 2025 07:24 AM

राज ठाकरेंच्या मोर्चाला उद्धव ठाकरे जाणार का?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं फेसबूक पोस्ट केली आहे. मराठी जना, मराठी मना, कैवारी तुझी शिवसेना असं पोस्टमध्ये म्हंटलंय. तसंच पक्षीय भेदाभेद विसरून, मराठी भाषेच्या लढ्यात सामील व्हा अस आवाहन आपण तमाम मराठी माणसांना करत असल्याचं त्यांनी म्हंटलंय. एकंदरीत मराठीच्या लढ्यात सामिल होण्याचं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलंय. मात्र तारखेचा उल्लेख टाळलाय. त्यामुळे राज ठाकरेंच्या मोर्चाला उद्धव ठाकरे जाणार का? मोर्चात ठाकरे बंधू एकत्र येणार का? याबाबत उत्सुकता आहे

27 June 2025 07:22 AM

हिंदी भाषा सक्तीविरोधात मुंबईत दोन मोर्चे काढले जाणार 

हिंदी भाषा सक्तीविरोधात मुंबईत दोन मोर्चे काढले जाणार आहेत. राज ठाकरेंकडून 5 जुलैला मोर्चाची घोषणा करण्यात आलीय. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी 7 जुलैच्या मोर्चाला पाठिंबा दिलाय.. मात्र मराठीच्या मुद्दयावर एकच मोर्चा निघणार का? असा प्रश्न आता विचारला जात आहे. एकच मोर्चा काढण्यासाठी मनसे आग्रही आहे. मात्र तारीख आधीच ठरल्यानं कृती समितीचीही पंचाईत झाली आहे. आता निर्णयात बदल करायचा असल्यास सर्वांना विश्वासात घेऊन ते करता येईल अशी भूमिका, कृती समितीचे डॉक्टर दीपक पवार यांनी मांडली आहे. 

27 June 2025 06:00 AM

मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या बेकायदेशीर कारवाईवर मच्छीमार समाजाचा तीव्र निषेध

ससून डॉकवरील महत्त्वपूर्ण मच्छीमार समाज मेळावा सकाळी 10:00 वाजता मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या बेकायदेशीर कारवाईचा तीव्र निषेध करण्यासाठी ससून डॉक येथे एकत्र येणार आहे. मुंबई पोर्ट प्राधिकरणाने चालू गोडाऊन रिकामे करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 12  जून 2015 रोजी सायन येथील सह्याद्री अतिथीगृहात घेतलेल्या निर्णयाकडे पूर्णतः दुर्लक्ष करून, हा निर्णय तत्कालीन माननीय सागरी परिवहन मंत्री श्री नितीन गडकरीजी यांच्या अध्यक्षतेखाली, माननीय मच्छीमारी मंत्री श्री एकनाथ खडसेजी, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष श्री रवी परमारजी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात आला होता.

27 June 2025 05:55 AM

शिवसेना UBT चा महाराष्ट्र वाहतुक सेना सहार कार्गो कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) महाराष्ट्र वाहतुक सेना सहार कार्गो कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा शुक्रवार म्हणजे आज. 27 जून 2025 रोजी. दुपारी 12.30 आयोजित करण्यात आला आहे. उद्‌घाटक सन्माननीय अ‍ॅड. अनिल परब शिवसेना नेते, विभाग प्रमुख, आमदार श्री. उदय दळवी, अध्यक्ष महाराष्ट्र वाहतुक सेना, सहार कार्गो कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ, सहार कार्यों, अंधेरी (पूर्व) मुंबई

27 June 2025 05:45 AM

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे माता रुक्मिणीच्या दर्शनानंतर घेणार कृषी विभागाची आढावा

राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे. बावनकुळे सर्वप्रथम कौंडण्यपूर येथे माता रुक्मिणीच्या मंदिरात जाऊन दर्शन येणार असून त्यानंतर कृषी विभागाची आढावा घेणार आहे त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काही बैठकी आयोजित करण्यात आला आहे

27 June 2025 05:40 AM

11 वी ऑनलाइन प्रवेशाची पहिली यादी 30 जून लाच 

अकरावी ऑनलाइन ची पहिली यादी आता थेट सोमवारी प्रसिद्ध होणार... पहिली यादीची प्रवेश प्रक्रिया सात दिवस चालेल नंतर 9 जुलैला दूसरी यादी जाहिर होईल

27 June 2025 05:32 AM

आज माउलींचे पहिले उभ रिंगण, तुकोबांचे मेढ्यांचे रिंगण

ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज सातारा जिल्ह्यातील तरडगाव कडे प्रस्थान ठेवेल. सकाळी लोणंद मधून निघेल दरम्यान माऊलींच्या पालखीचं पहिलं उभ रिंगण हे आज चांदोबाचा लिंब इथे दुपारी होईल, त्यानंतर रात्रीचा मुक्कामी तरडगाव मध्ये असणार आहे. तर संत तुकाराम महाराजांची पालखी आज सणसर गावाकडे प्रस्थान ठेवेल. बारामतीकराचा निरोप घेऊन पंढरपूरच्या दिशेने निघेल दरम्यान, संत तुकाराम महाराजांच्या पालखीच पहिलं मेंढ्यांचा रिंगण हे काटेवाडीमध्ये असेल त्याचबरोबर धोतरांच्या पायघड्यात ही घातल्या जातात. 

Read More