Marathi News> क्रिकेट
Advertisement

विरुष्काच्या लग्नसोहळ्यात 'ही' महत्त्वाची व्यक्ती मात्र नाराज...

विरुष्काने गुपचूप परदेशात जाऊन लग्न केले असले तरी त्यांचा लग्नसोहळा हा अनेकांसाठी विशेषकरून त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदसोहळा होता.

विरुष्काच्या लग्नसोहळ्यात 'ही' महत्त्वाची व्यक्ती मात्र नाराज...

नवी दिल्ली : विरुष्काने गुपचूप परदेशात जाऊन लग्न केले असले तरी त्यांचा लग्नसोहळा हा अनेकांसाठी विशेषकरून त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदसोहळा होता. त्यांच्या साखरपुड्यापासून रिसेप्शनपर्यंतचे सर्वच फोटोज, व्हिडिओज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. त्यांच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. 

पण एक व्यक्ती नाराज...

विरुष्काच्या लग्नाची सर्वत्र चर्चा होती. विरुष्काच्या लग्नाचे स्थळ, खर्च, त्यांचे शाही कपडे, पाहुणे, गिफ्ट हे सगळेच चर्चेचा विषय ठरले. सारे काही आनंदी असताना मात्र एक महत्त्वाची व्यक्ती विरूष्काच्या लग्नाने नाराज होती. ती म्हणजे अनुष्काची आजी. 

काय म्हणाली अनुष्काची आजी?

नाराज असलेली अनुष्काची आजी म्हणाली की, "माझ्या नातीचे लग्न असल्याचे वृत्त घरच्यांऐवजी मला प्रसार माध्यमांकडून समजले. माझा मुलगा रोज मला फोन करायचा, पण इतक्या महत्त्वाच्या निर्णयाविषयी सांगणे त्याला गरजेचे वाटले नाही." आजीची माया मात्र अलोट. काहीशा नाराज असल्या तरी त्यांनी कोणतीही तक्रार न करता आपल्या नातीला आशीर्वाद दिले.

fallbacks

Read More