Marathi News> क्रिकेट
Advertisement

KL Rahul-Athiya Shetty Wedding : दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे! अथिया शेट्टीसाठी नववधूप्रमाणं सजलं केएल राहुलचं घर; पाहा VIDEO

Athiya Shetty-KL Rahul's Wedding: अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटु के एल राहुल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांचा विवाहसोहळा खंडाळा याठिकाणी असणाऱ्या आलिशान बंगल्यामध्ये पार पडणार आहे. 

KL Rahul-Athiya Shetty Wedding : दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे! अथिया शेट्टीसाठी नववधूप्रमाणं सजलं केएल राहुलचं घर; पाहा VIDEO

Athiya Shetty - K L Rahul Wedding : सध्या बॉलीवुडमध्ये लग्नसराईचा मौसम सुरू होत आहे. या मौसमात क्रिकेटपटू के एल राहुल (KL Rahul) आणि अभिनेत्री आथिया शेट्टी (Athiya Shetty) याचं लग्न होणार असून तीन दिवस हा लग्नसोहळा होईल. मीडिया रिपोर्टनुसार या दोघांचं लग्न 23 जानेवारी रोजी होणार आहे. या दोघांच्या लग्नासाठी अवघे पाच दिवस शिल्लक राहिले आहेत. यांच्या दोघांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू असून के एल राहुलचे घर सुंदर दिव्यांनी सजवण्यात येत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  

गेल्या अनेक दिवसांपासून आथिया शेट्टी (Athiya Shetty)  आणि केएल राहुल (kl rahul) यांच्या लग्नाची चर्चा सुरू होती. या दोघांचं लग्न होणार कधी याची सर्वांनाच उत्सुकता होती. नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा त्या दोघांच्या लग्नविषयी चर्चा सुरू झाली. आता या दोघांच लग्न जानेवारी अखेरीस होणार असल्याचे समोर आलं. राहुल आणि अथिया याचं लग्न सुनील शेट्टी याच्या खंडाळा इथल्या बंगल्यात होणार आहे. दोघांच्या लग्नसोहळ्याचे विधी तीन दिवस चालणार आहेत. 

तीन दिवस लग्न सोहळा

अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांचा लग्नसोहळा 21 मे 23 जानेवारी या दिवसात होणार आहे. तीन दिवसांमध्ये लग्नाचे धार्मिक विधी होणार आहेत. या तीन दिवसांमध्ये हळद, मेहंदी, संगीत आणि लग्नसोहळा होणार आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही कुटुंबीयांनी संगीताची तयारी सुरू केली आहे. अहान शेट्टीने बहिणीच्या लग्नासाठी खास डान्स तयार केल्याचे सांगितले जात आहे. या लग्नात अगदी जवळच्या लोकांनाच आमंत्रित करण्यात आले. तसेच लग्नानंतर एक भव्य रिसेप्शन असेल ज्यामध्ये अनेक मोठ्या व्यक्तींचा समावेश असणार आहे. 

वाचा: न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात कोहलीच ठरणार KING? पाहा मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक 

निमंत्रण यादी तयार 

अथिया आणि केएल राहुल यांच्या कुटुंबातील जवळचे सदस्य या लग्न सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. या सोहळ्यात बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गजांची उपस्थितीही असू शकते. यामध्ये सलमान खान, जॅकी श्रॉर्फ, अक्षय कुमार, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली यांची नावे समोर आली आहेत. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये केएल राहुलच्या घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू असल्याचे दिसून आले. अथियाला त्यांच्या घरी आणण्यासाठी राहुलचे कुटुंबीय उत्सुक असल्याचे ही म्हटले आहे. अशा परिस्थितीत राहुलचे पाली हिल वांद्रे येथील घर सुंदर दिव्यांनी सजवण्यात आले आहे.

Read More