Marathi News> क्रिकेट
Advertisement

विरुष्काच्या रिसेप्शनला संपूर्ण बच्चन कुटुंबियांची हजेरी

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्‍का शर्मा यांचा इटलीमध्ये विवाह पार पडल्यानंतर मंगळवारी मुंबईमध्ये त्यांनी खास ग्रँड रिसेप्शन ठेवलं होतं.

विरुष्काच्या रिसेप्शनला संपूर्ण बच्चन कुटुंबियांची हजेरी

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्‍का शर्मा यांचा इटलीमध्ये विवाह पार पडल्यानंतर मंगळवारी मुंबईमध्ये त्यांनी खास ग्रँड रिसेप्शन ठेवलं होतं.

बच्चन कुटुंबियांची हजेरी

या रिसेप्शनला बॉलिवूडचे शहशाह अमिताभ बच्चन यांनी सहकुटुंब हजेरी लावली. ऐश्वर्या रॉय-बच्चन, अभिषेक बच्चन हे देखील यावेळी उपस्थित होते. अमिताभ यांची मुलगी श्वेता ही देखील रिसेप्शनला त्यांच्यासोबत उपस्थित होती.

दिग्गजांची हजेरी

बॉलिवूड आणि क्रिकेटमधल्या व्यक्तींसाठी हे खास रिसेप्शन ठेवण्यात आलं होतं. अनेक दिग्गज या रिसेप्शनला उपस्थित होते. विरूष्काच्या मुंबईतील रिसेप्शन सोहळ्याला सुमारे ६०० पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते. 

मुंबईतील रिसेप्शनला अभिनेता बोमन इराणी, संदीप पाटील सपत्निक पोहचले होते. सोबतच क्रिकेटर रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मनीष पांडे हे देखील पोहोचले होते. या सोबतच कॅटरिना कैफ, रनबीर कपूर, सौरव गांगुली, लारा दत्ता, माधुरी दीक्षित, ए.आर रेहमान यांनी देखील या रिसेप्शनला हजेरी लावली.

Read More