Marathi News> क्रिकेट
Advertisement

एकेकाळी सलमानच्या अभिनेत्रीला डेट करत होता गांगुली! लग्न मोडायलाही होता तयार, जाणून घ्या अधुऱ्या प्रेमकहाणीबद्दल

Happy Birthday Sourav Ganguly: भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू सौरव गांगुली आनंदी वैवाहिक जीवन जगत आहे. पण एक वेळ अशी आली जेव्हा एक अभिनेत्री त्याच्या आयुष्यात आली आणि तेव्हा तो तिच्यासाठी आपले लग्न तोडण्यास तयार झाला.   

एकेकाळी सलमानच्या अभिनेत्रीला डेट करत होता गांगुली! लग्न मोडायलाही होता तयार, जाणून घ्या अधुऱ्या प्रेमकहाणीबद्दल

Actress Nagma and Sourav Ganguly:  सौरव गांगुली हे क्रिकेटविश्वातील एक मोठं नाव. मैदानावर या नावाने अनेक ऐतिहासिक विजय मिळवले.  टीम इंडियाचे यशस्वी कर्णधार झाला आणि पुढे जाऊन बीसीसीआयचे अध्यक्षही बनला. आज 8 जुलै रोजी सौरभ गांगुली त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. आज तो 53 वर्षाचा झाला आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात एक काळ असा होता, जेव्हा ते त्यांच्या खास नात्यामुळेही तितकेच चर्चेत आले होते. ते नातं होतं सलमान खानची अभिनेत्री नग्मासोबतचं. जे त्या वेळी खूप चर्चेत आलं होतं. 

जेव्हा गांगुलीचं आलं होत नागमावर मन 

90च्या दशकाच्या उत्तरार्धात सौरव गांगुली क्रिकेटमध्ये स्वतःचं स्थान पक्कं करत होता. त्याच काळात, त्याच्या नावाची अभिनेत्री नग्मासोबत जोरदार चर्चा रंगू लागली होती. दोघं मुंबईतील एका कार्यक्रमात पहिल्यांदा भेटले आणि तिथूनच मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं असे सांगितले जाते. 

हे ही वाचा: Happy Birthday Sourav Ganguly: 48 खोल्या, बंगाली परंपरा...वाढदिवसानिमित्त बघा 'दादा'च्या राजवाड्यासारख्या घरचे Inside Photos

 

प्रेम इतकं की... लग्न मोडायला तयार होता सौरव?

माध्यमांच्या अहवालानुसार, दोघं जवळपास दोन वर्षं एकमेकांना डेट करत होते. नग्माने नंतर दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की सौरव इतके प्रेमात होते की त्यांनी आपल्या वैवाहिक आयुष्याला संपवून तिच्याशी लग्न करण्याची तयारीही दर्शवली होती. मात्र त्यांची पत्नी डोनाने त्याला घटस्फोट देण्यास नकार दिला होता.

हे ही वाचा: "गंभीरबद्दल काहीही बोलू नका....", योगराज सिंग यांचं मोठं वक्तव्य; राहुल द्रविड़ आणि युवराजचा उल्लेख करत दिला संदेश

 

नात्याचा शेवट वाईट 

हे प्रकरण जेव्हा माध्यमांमध्ये गाजू लागलं, तेव्हा याचा परिणाम गांगुलीच्या क्रिकेट कारकिर्दीवरही होऊ लागला. गोंधळ वाढत गेला आणि एकप्रकारे सामाजिक दबावामुळे सौरवने नग्मापासून अंतर ठेवायला सुरुवात केली. अखेर 2001 साली दोघांचं ब्रेकअप झालं आणि गांगुली आपल्या कुटुंबाकडे परत गेला.

हे ही वाचा: प्रायव्हेट जेट आणि लक्झरी गाड्या...निवृत्तीनंतरही MS Dhoni कसा कमवतोय करोडो रुपये? जाणून घ्या Net Worth

 

'असं' आहे गांगुलीच कुटुंब 

सौरव गांगुली यांनी 1997 साली डोना गांगुलीसोबत विवाह केला होता. त्यांना सना गांगुली ही मुलगी आहे. एकेकाळच्या या प्रेमप्रकरणाची आता फक्त आठवण उरली आहे. सध्या सौरव गांगुली एका यशस्वी व्यावसायिकाच्या भूमिकेत, आपल्या कुटुंबासोबत छान जीवन जगत आहेत.

Read More