Marathi News> क्रिकेट
Advertisement

CSK प्ले ऑफमधून बाहेर गेल्यानंतर साक्षी धोनीची भावूक पोस्ट

साक्षीची भावूक पोस्ट

CSK प्ले ऑफमधून बाहेर गेल्यानंतर साक्षी धोनीची भावूक पोस्ट

नवी दिल्ली : आयपीएलमध्ये तीन वेळा चॅम्पियन राहीलेल्या चेन्नई सुपर किंग्जचे प्रदर्शन यंदा निराशाजनक राहीले आहे. रॉयल चॅलेंजर बॅंगलोरला ८ विकेट्सनी हरवल्यानंतरही सीएसके प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर गेलीय. राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडीयन्सला मात दिल्यानंतर चेन्नईची प्लेऑफ संधी गेली होती. चेन्नईच्या टीमने प्ले ऑफमध्ये स्थान न मिळवणं हे आयपीएलच्या इतिहासात पहील्यांदाच होतंय. 

धोनीच्या टीमने केलेलं प्रदर्शन पाहून फॅन्स खूपच निराश आहेत. दरम्यान महेंद्रसिंग धोनीची बायको साक्षीने एक इमोशनल पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केलीय. सीएसके प्लेऑफमध्ये न पोहोचल्याबद्दल तिने ही पोस्ट केलीय. खूप भावनिक कविता तिने लिहिलेय. यामध्ये ती चेन्नईला विजयी म्हटली आहे. या टीमने नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय. प्रेक्षकांच्या मनात टीम नेहमीच सुपर किंग्ज राहील असं तिला यातून सांगायचंय. 

हा केवळ एक खेळ आहे. तुम्ही कधी जिंकता कधी हरता. कित्येक वर्ष विजयाचे साक्षीदार बनता तर कधी पराजयाचा सामना करता. एक आनंद साजरा करत असतो तर दुसऱ्यांचं मन तुटत असतं.

काही विजय, काही पराजय दुसऱ्यांच्या लक्षात राहतात. हा एक खेळ आहे. इथे कोणी हरु इच्छित नाही. पण सर्व विजेते नाही होऊ शकत. तुम्ही विजेते होतात. तुम्ही आजही विजेते आहात. खऱ्या योद्धाचा जन्म झालाय. असे या कवितेचे बोल आहेत.  

Read More