Marathi News> क्रिकेट
Advertisement

एकेकाळी IPL मध्ये 'या' संघाचा भाग होते तेजस्वी यादव

बिहारच्या राजकारणातील एक महत्त्वाचं नाव म्हणून साऱ्या देशाच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या आहेत   

एकेकाळी IPL मध्ये 'या' संघाचा भाग होते तेजस्वी यादव

नवी दिल्ली : देशभरात बिहार विधानसभा निवडणुकांची चर्चा सुरु असतानाच इथं सत्तापालट tejashwi yadav तेजस्वी यादव याच्या हाती सत्तेच्या चाव्या जाणार का, हाच प्रश्न उपस्थित केला जात आहे. तेजस्वी यादव यांच्या कारकिर्दीबाबत तरुण वर्गात कुतूहल पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या मैदानात उतरुन प्रसिद्धीझोतात येणारे हेच तेजस्वी यादव एकेकाळी क्रिकेटच्या मैदानातही सक्रीय होते. 

बिहारच्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळण्याचा अनुभव असणारे तेजस्वी यादव राजकारणापूर्वी क्रिकेट विश्वात सक्रीय होते. 

क्रीडा क्षेत्रात, विशेषत: क्रिकेट जगतामध्ये त्यांची फार मोठी कारकिर्द पाहायला मिळाली नाही. क्रिकेटपासून दुरावल्यानंतर त्यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकीय कारकिर्दीवर लक्ष केंद्रीत केलं. 

२००८ ते २०१२ या काळात तेजस्वी यादव IPL मध्ये दिल्लीच्या संघाचा भाग होते. यामध्ये त्यांना प्लेइंग इलेव्हनधमध्ये फारशी संधी मिळाली नाही. 

स्थानिक पातळीवरही क्रिकेट क्षेत्रात सक्रिय 

तेजस्वी यादव यांची क्रिकेट कारकिर्द फार मोठी नसली तरीही तिचा उल्लेख मात्र आवर्जून केला जातो. या कारकिर्दीत त्यांनी स्थानिक पातळीवर ७ सामने खेळले. ज्यामध्ये ३७ धावा आणि एक विकेट घेण्यातच ते यशस्वी ठरेले होते. 

 

तेजस्वी यांनी पहिला फर्स्ट क्लास सामना झारखंडच्या संघाकडून खेळला होता. यामध्ये त्यांना फार चांगलं प्रदर्शन मात्र करता आलं नव्हतं. २०१० मध्ये विजय हजारे चषकामध्ये त्यांनी झारखंडच्या संघातून ऑलराऊंडर म्हणून सामना खेळला. सैय्यद मुश्ताक अली चषकासाठीही त्यांना संधी मिळाली. पण, त्यातही ते उल्लेखनीय कामगिरी करु शकले नाहीत. क्रिकेटच्या कारकिर्दीत त्यांना फारसं यश हाती लागलं नाही. पण, तरीही राजकीय कारकिर्दीत मात्र त्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं ही बाब नाकारता येणार नाही. 

Read More