Marathi News> क्रिकेट
Advertisement

IPL Final नंतर Ruturaj Gaikwad ने पोस्ट केला Girlfriend बरोबरचा फोटो! सायली संजीव कमेंट करत म्हणाली, "तुम्हा दोघांना..."

Ruturaj Gaikwad Photo With Girlfriend Sayali Sanjeev Comment: मध्यंतरी ऋतुराज आणि सायली संजीव या दोघांच्या नावाने उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं. यासंदर्भात सायलीने अनेक मुलाखतींमध्ये उघडपणे भाष्य केलं होतं. या दोघांच्या कथित नात्याबद्दल सोशल मीडियावरुन कायमच चर्चा होत राहिल्याचं दिसून आलं आहे.

IPL Final नंतर Ruturaj Gaikwad ने पोस्ट केला Girlfriend बरोबरचा फोटो! सायली संजीव कमेंट करत म्हणाली,

Ruturaj Gaikwad Photo With Girlfriend Sayali Sanjeev Comment: इंडियन प्रमिअर लिगचा (IPL 2023) गुजरात टायन्सविरुद्धचा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्सच्या (GT vs CSK IPL Final) संघाने 5 विकेट्स राखून जिंकला. या सामन्यामध्ये चेन्नईचा मधल्या फळीतील फलंदाज रविंद्र जडेजाने अगदी शेवटच्या 2 चेंडूंवर 10 धावा काढत संघाला निसटता विजय (CSK Win IPL 2023) मिळवून दिला. या विजयाबरोबरच चेन्नईने पाचव्यांदा आयपीएलच्या चषकावर नाव कोरलं. विजयानंतर झालेल्या सेलिब्रेशनमध्ये खेळाडूंचे कुटुंबियही सहभागी झाले होते. यामध्ये खेळाडूंच्या पत्नींबरोबरच त्यांची मुलंही सहभागी झाली होती. मात्र या सर्वांमध्ये लक्ष वेधून घेतलं ते चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडबरोबर (Ruturaj Gaikwad) असलेल्या एका तरुणीने. ही तरुणी ऋतुराजची होणारी पत्नी (Ruturaj Gaikwad Wife) आहे. पहिल्यांदाच ऋतुराज आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीचे फोटो सार्वजनिकरित्या समोर आले आहेत. चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन हा फोटो पोस्ट करण्यात आल्यानंतर ऋतुराजनेही एक फोटो पोस्ट केला आहे. ऋतुराजच्या या फोटो मराठी कलाकांरांनी कमेंट्स केल्या आहेत. यामध्ये गायक आणि गीतकार सलील कुलकर्णीबरोबच ऋतुराजबरोबर नाव जोडली गेलेली मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवचाही समावेश आहे.

ऋतुराजसाठी दमदार वर्ष

यंदाच्या पर्वामध्ये ऋतुराजने दमदार कामगिरी केली. यंदाच्या पर्वामध्ये ऋतुराज 16 सामने खेळला. यापैकी 14 सामन्यांमध्ये त्याला फलंदाजीची संधी मिळाली ज्यात त्याने 564 धावा केल्या. मुळ पुण्याचा असलेल्या ऋतुराजने यंदाच्या पर्वामध्ये संयमी आणि गरज पडेल तेव्हा आक्रमक फलंदाजी केली. चेन्नईच्या संघाला पाचव्यांदा जेतेपदापर्यंत नेण्यासाठी बरीच मेहनत घेतल्याचं आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे महत्त्वाच्या सामन्यांमध्ये ऋतुराजने केलेल्या फलंदाजीचा संघाला खरोखरच चांगला फायदा झाला. शेवटच्या सामन्यात ऋतुराजने 16 चेंडूंमध्ये 26 धावा केल्या. यामध्येही त्याने काही सुंदर फटके लगावले. अंतिम सामन्यातील विजयानंतर सेलिब्रेशनदरम्यान ऋतुराज त्याच्या गर्लफ्रेण्डबरोबर दिसून आला. 

चेन्नईच्या अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला फोटो

ऋतुराजच्या गर्लफ्रेण्डचं नाव उत्कर्षा असं आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या अकाऊंटवरुन ऋतुराज आणि उत्कर्षाचे आयपीएलच्या ट्रॉफीबरोबरचा फोटो शेअर करण्यात आला आहे. "हे फार छान वर्ष आहे," अशी कॅप्शन या फोटोला देण्यात आली आहे. या फोटोत आयपीएलची ट्रॉफी हातात घेऊन दोघेही हसताना दिसत आहेत.

ऋतुराजनेच पोस्ट केला तिच्यासोबतचा फोटो

अन्य एका फोटोमध्ये ऋतुराज आणि उत्कर्षा चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीबरोबर एका बाकड्यावर बसल्याचं दिसत आहे. या फोटोला ऋतुराजने कॅप्शन देताना, "माझ्या आयुष्यातील दोन अती महत्त्वाच्या व्यक्ती" असं म्हटलं आहे. "मी यासाठी देवाचा कायमच आभारी राहील," असं ऋतुराजने म्हटलं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ruturaj Gaikwad (@ruutu.131)

सायली संजवीची कमेंट

ऋतुराजने पोस्ट केलेल्या या VVIP कॅप्शनच्या फोटोवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. या फोटोला 7 लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. या फोटोवरच अनेकांनी लग्नाआधीच या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक व्हेरिफाइड आकऊंट्सवरुनही शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. यामध्ये गायक आणि संगीतकार सलील कुलकर्णींचाही समावेश आहे. "दोन्ही आघाड्यांवर मिळावलेल्या खूप साऱ्या शुभेच्छा," असं ऋतुराजला शुभेच्छा देताना सलील कुलकर्णी यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे ऋतुराजच्या या पोस्टवर अभिनेत्री सायली संजीवनेही कमेंट केली आहे. "तुम्हा दोघांनाही फार साऱ्या शुभेच्छा," असं सायलीने कमेंटमध्ये ऋतुराज आणि उत्कर्षाला टॅग करत म्हटलं आहे. या कमेंटमध्ये सायलीने हार्टचा इमोजीही वापरला आहे. सायलीच्या कमेंटलाही 700 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

fallbacks

ऋतुराज आणि सायली संजीवचं नाव होतं चर्चेत

ऋतुराज आणि सायली संजीव या दोघांबद्दल क्रिकेट चाहत्यांमध्ये उलट सुलट चर्चा होत्या. अनेक मुलाखतींमध्ये सायली संजीवने आमच्या तसं काहीही नसून आम्ही चांगले मित्र आहोत असं सांगितलं होतं. आता ऋतुराजचं लग्न ठरल्यानंतर सायलीने त्याला आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीला शुभेच्छा दिल्या आहेत. 

Read More