Marathi News> क्रिकेट
Advertisement

Shikhar Dhawan चा अभिनेत्रीसोबत रोमँटिक डान्स, धवनला मिळाली नवी जोडीदार?

Shikhar dhawan in bollywood: शिखर धवन लवकरच सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून ते बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे.

Shikhar Dhawan चा अभिनेत्रीसोबत रोमँटिक डान्स, धवनला मिळाली नवी जोडीदार?

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरीजमध्ये टीम इंडियाचा कर्णधार असलेल्या शिखर धवनच्या आयुष्यात पुन्हा एक नवी महिला आल्याचं बोललं जात आहे. शिखर धवनचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण या फोटोमध्ये दिसणारी ती महिला आहे अभिनेत्री हिमा कुरैशी. हिमा कुरैशी (Huma Qureshi) आणि सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) यांचा एक नवा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. (Shikhar Dhawan romantic dance with huma qureshi)

सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरैशी यांचा 'डबल एक्सएल' (Double XL)सध्या चर्चेत आहे. यामध्ये दोन प्लस-साइज महिलाची कथा दाखवण्यात आली आहे. सतराम रमानी दिग्दर्शित या सिनेमात कॉमेडी ड्रामा देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणारे. सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरैशी यांच्यासह जहीर इकबाल आणि महत राघवेंद्र देखील या सिनेमात दिसणार आहेत. इतकंच नाहीतर भारतीय क्रिकेटर शिखर धवन (Shikhar Dhawan) देखील डबल एक्सएल सिनेमात खास अंदाजात दिसणार आहे.

सोनाक्षी आणि हुमा कुरैशी (Sonakshi sinha and Huma qureshi) यांच्या डबल एक्सएल सिनेमाचा ट्रेलर देखील चर्चेत राहिला. पण शिखर धवनच्या चाहत्यांमध्ये देखील उत्सूकता दिसतेय. तो म्हणतो की, 'देशासाठी खेळताना एक खेळाडू म्हणून आयुष्य व्यस्त असतं. चांगल्या मनोरंजन सिनेमा पाहणे मला आवडतात. पण माझ्याकडे याची संधी आली. तेव्हा कथा ऐकून मला ती आवडली. मला आशा आहे की, युवती आणि युवक त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धावत राहतील. मग काहीही होऊ देत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Huma Qureshi (@iamhumaq)

Double XL हा सिनेमा 4 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. गुलशन कुमार, टी-सीरीज, वाकाओ फिल्म्स आणि मुदस्सर अजीज यांची प्रस्तूती असलेला हा सिनेमा प्रेक्षकांचं नक्कीच मनोरंजन करेल.

Read More