Marathi News> क्रिकेट
Advertisement

WTC Final : भारतीय संघातून 'या' महत्त्वाच्या खेळाडूला वगळलं

WTC Final सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.

WTC Final : भारतीय संघातून 'या' महत्त्वाच्या खेळाडूला वगळलं

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना विराट कोहलीची टीम इंडिया आणि केन विलियम्सनची टीम न्यूझीलंड यांच्यामध्ये 18 जून रोजी हा सामना रंगणार आहे. दरम्यान या महत्त्वाच्या सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली असून यामध्ये भारताचा स्टार खेळाडू के एल राहुलला टीममधून वगळण्यात आलं आहे. 

मंगळवारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी न्यूझीलंड आणि इंडिया या दोन्ही देशांनी टीमची घोषणा केली.  बीसीसीआयने 15 जणांच्या टीममध्ये रिषभ पंत आणि रिद्धिमान साहा अशा 2 विकेटकीपरचा समावेश केला आहे. तर  रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा या दोन स्पिनर बॉलर्सना टीममध्ये स्थान देण्यात आलं आहे. मात्र ओपनर के एल राहुलला मात्र टीममध्ये जागा दिलेली नाही.

के.एल राहुलला टीममधून वगळ्यामुळे टीम मॅनेजमेंटवर टीका करण्यात येत आहे. के.एल राहुलला टीममध्ये स्थान न दिल्यामुळे फॅन्सने सोशल मीडियावर चांगलाच गदारोळ माजवला. अनेकांनी टीम मॅनेजमेंटच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करत राहुलला का वगळलं असा सवालंही केला आहे.

टीम इंडियाचा संघ

रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मो. शमी, मो. सिराज, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, केएल राहुल, ऋद्धिमान साहा

किवी टीममध्ये 15 खेळाडू कोण? 

केन विलियमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डेवोन कॉन्वे, कोलिन डि ग्रँडहोम, मॅट हेनरी, काइल जेमिसन, टॉम लाथम, हेनरी निकोलस, एजाज पटेल, टिम साउदी, रॉस टेलकर, नील वैगनर, बीजे वाटलिंग, विल यंग या खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे. 

Read More