Iftikhar Ahmed Quetta vs Peshawar: पाकिस्तानचा फलंदाज इफ्तिखार अहमदने (Iftikhar Ahmed) रविवारी असा पराक्रम केला की सोशल मीडियावर त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. एका ओव्हरमध्ये बॅक टू बॅक 6 षटकार मारत पाकिस्तानी क्रिकेटरने टीम इंडियाचा (Team India) सिक्सर किंग युवराज सिंगची (Yuvraj Singh) आठवण करून दिली. विशेष म्हणजे अशा गोलंदाजावर त्याने हा पराक्रम केला जो आगामी काळात पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या क्रीडा मंत्रीपदाची खुर्ची सांभाळणार आहे. इफ्तिखारच्या (Iftikhar Ahmed) या सहा षटकारांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Video Viral) होत आहे.
13 फेब्रुवारीपासून पाकिस्तान सुपर लीग (PSL) सुरू होत आहे. पण मुख्य हंगाम सुरू होण्यापूर्वी 5 फेब्रुवारी रोजी क्वेटा ग्लॅडिएटर्स (Quetta Gladiators) आणि पेशावर झाल्मी यांच्यात एक सामना खेळला गेला. या सामन्यात क्वेटाची धावसंख्या 19 षटकात केवळ 148 धावा होती. पेशावरसाठी शेवटचे षटक टाकण्यासाठी आलेल्या वहाब रियाझने 3 षटकात केवळ 11 धावा दिल्या आणि तीन बळी घेतले. त्यानंतर शेवटच्या षटकात इफ्तिखारने रियाझच्या एकाच षटकात 6 षटकार मारून 36 धावा केल्या. त्यानंतर इफ्तिखार अहमदही 6 चेंडूत 6 षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे.
Iftikhar goes big in the final over of the innings!
— Pakistan Cricket (@TheRealPCB) February 5, 2023
Watch Live https://t.co/xOrGZzkfvl pic.twitter.com/CDSMFoayoZ
इफ्तिखार अहमदच्या 6 षटकारनंतर टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज युवराज सिंहची (Yuvraj Singh) आठवण करून दिली. युवराज सिंहने 2007 साली खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 विश्वचषकातही इंग्लंडविरुद्ध एका षटकात 6 षटकार मारले होते. पाकिस्तान सुपर लीगपूर्वी क्वेटा आणि पेशावर यांच्यात खेळल्या जात असलेल्या प्रदर्शनीय सामन्यात इफ्तिखार अहमदने क्वेटाकडून खेळताना डावाच्या शेवटच्या षटकात सहा षटकार ठोकले. त्याचा व्हिडिओ पीसीबीच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे.
वाचा: मोठी बातमी! भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना रद्द?
इफ्तिखार अहमदने या सामन्यात 50 चेंडूत 94 धावांची शानदार खेळी केली. त्याने 44 चेंडूत 58 धावा केल्या. पण शेवटच्या 6 चेंडूंवर त्याने खेळ पूर्णपणे फिरवला. या सामन्यात खेळताना क्वेटा ग्लॅडिएटर्सने 5 गडी गमावून 184 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत कोणत्याही स्तरावर अशी कामगिरी करणारा तो पाकिस्तानचा एकमेव क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी इफ्तिखारने आंतरराष्ट्रीय खेळात पाकिस्तानसाठी चार कसोटी आणि 10 एकदिवसीय सामने खेळले आहेत. याशिवाय त्याने 43 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळताना 36 डावांत 654 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3 अर्धशतके आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याचा स्ट्राइक रेट 125 पेक्षा जास्त आहे.