Marathi News> शिक्षण
Advertisement

महाराष्ट्र राज्याच्या 'या' विभागात भरती, असा करा अर्ज

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रणमध्ये पद भरती करण्यात येणार आहे. 

महाराष्ट्र राज्याच्या 'या' विभागात भरती, असा करा अर्ज

मुंबई : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रणमध्ये पद भरती करण्यात येणार आहे. राज्य कौशल्य विकास सोसायटीसाठी अर्ज  करण्याची अंतिम तारीख  ४ नोव्हेंबर  २०२० आणि  राज्य एड्स नियंत्रणमध्ये १० नोव्हेंबर २०२० पर्यंत अर्ज करता येणार आहे. 

 कौशल्य विकास सोसायटी । विविध पदाची भरती

पदाचे नाव : कौशल्य अभियान अधिकारी वर्ग १
शैक्षणिक पात्रता – सेवानिवृत्त मंत्रालयीन अवर सचिव अथवा कोणतेही क्षेत्रिय विभागाच्या मुख्यालयात किमान ५ वर्षे अनुभव असलेले समकक्ष अधिकारी
पदाचे नाव : कौशल्य अभियान अधिकारी वर्ग २
शैक्षणिक पात्रता - सेवानिवृत्त मंत्रालयीन कक्ष अधिकारी अथवा कोणतेही क्षेत्रिय विभागाच्या मुख्यालयात किमान ५ वर्षे अनुभव असलेले समकक्ष अधिकारी
पदाचे नाव : कौशल्य अभियान अधिकारी वर्ग ३
शैक्षणिक पात्रता - सेवानिवृत्त मंत्रालयीन सहायक कक्ष अधिकारी अथवा कोणतेही क्षेत्रिय विभागाच्या मुख्यालयात किमान ५ वर्षे अनुभव असलेले समकक्ष अधिकारी
पदाचे नाव : सहायक लेखा अधिकारी – २ पदे
शैक्षणिक पात्रता – वाणिज्य/लेखा/वित्त शाखेची पदवी आणि अनुभव
पदाचे नाव : सहायक लिपीक – ४ पदे
शैक्षणिक पात्रता – शासकीय सेवेतून लिपिक संवर्ग पदावरून सेवानिवृत्त असावा आणि अनुभव
वयोमर्यादा – कमाल ६५ वर्षे
अधिक माहितीसाठी : https://kaushalya.mahaswayam.gov.in/users/tenders या लिंकवर अथवा www. kaushalya.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

राज्य एड्स नियंत्रणमध्ये पद भरती

पदाचे नाव : सहायक संचालक – आईसी १ पद
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी आणि अनुभव
पदाचे नाव : उपसंचालक – आईसी १ पद
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी आणि अनुभव
पदाचे नाव : उपसंचालक – टीआय १ पद
शैक्षणिक पात्रता : सामाजिक शास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि अनुभव
पदाचे नाव : उपसंचालक – एसटीआय १ पद
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस आणि अनुभव
पदाचे नाव : भांडार अधिकारी १ पद
शैक्षणिक पात्रता : पदवी आणि अनुभव
पदाचे नाव : सहाय्यक संचालक – व्हि.वी.डी १ पद
शैक्षणिक पात्रता : सामाजिक शास्त्र/समाजशास्त्र/समाज कार्य विषयात पदव्युत्तर पदवी आणि अनुभव
पदाचे नाव : सहाय्यक संचालक – गुणवत्ता व्यवस्थापक (रक्त सुरक्षा) – १ पद
शैक्षणिक पात्रता : एमएससी/बीएससी आणि अनुभव
पदाचे नाव : सहाय्यक संचालक – गुणवत्ता व्यवस्थापक (लॅब सेवा) – १ पद
शैक्षणिक पात्रता : एमएससी/बीएससी आणि अनुभव
पदाचे नाव : सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी – ३ पदे
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी आणि अनुभव

पदाचे नाव : संगणकसाक्षर स्टेनो – २ पदे

शैक्षणिक पात्रता : पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा : कमाल ६० वर्षे
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : १० नोव्हेंबर २०२०
अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2G5NFJS या लिंकवर अथवा http://www.mahasacs.org या संकेतस्थळाला भेट द्या
अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण मंडळ, ॲकवर्थ लेप्रसी कॉम्पलेक्स, वडाळा पुलाजवळ, आर.ए.किडवई रोड, वडाळा (प) मुंबई – ४०००३१

Read More