Marathi News> शिक्षण
Advertisement

सचिन तेंडुलकरच्या मुंबईतील मराठी शाळेचे नाव बदलणार

क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर ज्या शाळेत शिकला त्या दादरच्या शारदाश्रम शाळेचे  नाव कायमचे मिटले जाणार आहे.

सचिन तेंडुलकरच्या मुंबईतील मराठी शाळेचे नाव बदलणार

मुंबई : क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा वाढदिवस असतानाच दुसरीकडं सचिननं ज्या दादरच्या शारदाश्रम शाळेतून शिक्षण घेतले त्या शाळेचे एसव्हीएम इंटरनँशनल स्कूल असं नवं नामकरण केलं जाणार आहे. संबंधित शाळा व्यवस्थापनाने इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेचे नाव बदलण्याचा ठराव सहमत केल्यानंतर हा प्रस्ताव आता मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीसमोर आला आहे. शुक्रवारी शिक्षण समितीने या प्रस्तावाला सहमती दिल्यानंतर शारदाश्रम विद्यामंदिर हे नाव कायमचे मिटले जाणार आहे.

सचिनची शाळा म्हणून ओळख

सचिन तेंडुलकरची शाळा म्हणून त्याच्या क्रिकेट चाहत्यांना या शाळेची ओळख आहे. सचिनच्या अनेक आठवणी या शाळेशी जोडल्या गेल्या आहेत. मुंबई महापालिकेने या शाळेच्या १ ली ते ४ थी पर्यंतच्या १२ वर्ग तुकड्यांना कायम विनाअनुदानित तत्वावर मान्यता दिली असल्यानं शाळेच्या नामांतरास शिक्षण समितीची सहमती गरजेची असते. शाळा व्यवस्थापनाने फेब्रूवारी २०१७ मध्ये इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेच्या नावात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. माध्यमिक शाळेच्या नाव बदलास शिक्षण उपसंचालकांनी मान्यता दिल्यानंतर आता प्राथमिक शाळेचे नाव बदलण्याचा प्रस्ताव बीएमसीच्या शिक्षण समितीसमोर आला आहे. 

Read More