Marathi News> शिक्षण
Advertisement

अशक्य पण हे सत्य ! महिला शिक्षकाने २५ शाळेत काम करत एक कोटी पगार घेतला

एक महिला शिक्षिकेने एक कोटी रुपये पगार घेत अशक्य ते शक्य करुन दाखविले आहे. या शिक्षिकेने तब्बल २५ शाळांमध्ये काम केले आणि पगारापोटी एक कोटी रुपये मिळविलेत. 

अशक्य पण हे सत्य ! महिला शिक्षकाने २५ शाळेत काम करत एक कोटी पगार घेतला

मुंबई : एक महिला शिक्षिकेने एक कोटी रुपये पगार घेत अशक्य ते शक्य करुन दाखविले आहे. या शिक्षिकेने तब्बल २५ शाळांमध्ये काम केले आणि पगारापोटी एक कोटी रुपये मिळविलेत. एक शिक्षिका इतके वेतन कसे काय घेऊ शकते, असा सवाल तुम्हाला पडला असेल तर तो खरा आहे. ही शिक्षक महिला डिजिटल डेटाबेसमुळे पकडली गेली आहे. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयमध्ये पूर्णवेळ विज्ञान शिक्षक म्हणून नोकरी करत होती. आंबेडकर नगर, बागपत, अलीगढ, सहारनपूर आणि प्रयागराज या जिल्ह्यात काही शाळांमध्ये एकाचवेळी काम करत होती. शिक्षकांचा डेटाबेस तयार केला जात असताना ही बाब उघडकीस आली. 

उत्तर प्रदेशमधील प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या उपस्थितीच्या वास्तविक वेळेवर नजर ठेवूनही अनामिका शुक्ला नावाच्या या शिक्षिकेने तसे केले. या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे. दरम्यान, या महिला शिक्षकाशी संपर्क झालेला नाही. मानवी सेवा पोर्टलवर शिक्षकांच्या डिजिटल डेटाबेसमध्ये शिक्षकांचे वैयक्तिक रेकॉर्ड, पदोन्नतीची तारीखची आवश्यकता होती. त्यावेळीअनामिका शुक्ला यांचा तपशिल पुढे आला. ही शिक्षका तब्बले २५ शाळांच्या सूचीबद्ध असल्याचे आढळले. शालेय शिक्षण महासंचालक विजय किरण आनंद यांनी सांगितले की, या शिक्षकाविषयी तथ्य शोधण्यासाठी चौकशी सुरु आहे.

एका शिक्षिकेने एकाच वेळी २५ शाळांमध्ये एकवर्षांपेक्षा जास्त काळ काम करत एक कोटी रुपयांचा पगार घेतल्याचे सांगण्यात येत आहे. शाळेच्या रिकॉर्डनुसार शुक्ला काम करत होती. सर्व शाळांमधील नोंदीनुसार शुक्ला एका वर्षापेक्षा जास्त काळ या शाळांच्या पेरोलवर होती.  केजीबीव्ही ही कमकुवत विभागातील मुलींसाठी निवासी शाळा आहे, जिथे शिक्षकांची नेमणूक करारावर केली जाते. त्यांना दरमहा सुमारे ३०,००० रुपये दिले होते. जिल्ह्यातील प्रत्येक गटात कस्तुरबा गांधी शाळा आहे.

२०२० फेब्रुवारीपर्यंत या शिक्षिकेने एक कोटी रुपये पगार घेतला घेतल्याचे पुढे आले आहे. अनामिकाने फेब्रुवारी २०२० पर्यंत १३ या शाळांकडून पगाराच्या रुपात एक कोटी रुपये घेतले आहेत. मैनपुरीची रहिवासी अनामिका शुक्ला फेब्रुवारीपर्यंत रायबरेली येथील केजीबीव्हीमध्ये काम करताना आढळली, जेव्हा तिचा हा बनाव उघड झाला आहे.

Read More