Marathi News> मनोरंजन
Advertisement

10500 साड्या, 1250 किलो चांदी आणि 28 किलो सोने; 70 च्या दशकातील 'ही' अभिनेत्री होती सर्वात श्रीमंत, संपत्ती तब्बल...

Guess This Actress: 70 च्या दशकात अशी एक अभिनेत्री होती, जिला त्या काळातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री मानले जात असे. या अभिनेत्रीने 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. पाहूयात कोण होती ही अभिनेत्री.

10500 साड्या, 1250 किलो चांदी आणि 28 किलो सोने; 70 च्या दशकातील 'ही' अभिनेत्री होती सर्वात श्रीमंत, संपत्ती तब्बल...

Jayalalitha: 70 च्या दशकात अशी एक अभिनेत्री होती, जिने चित्रपटसृष्टीत असा ठसा उमटवला की संपूर्ण देश तिच्या अभिनयाचा आणि नृत्याचा चाहता झाला. तिने 300 हून अधिक चित्रपटांत काम करून सुपरहिट कामगिरी केली आणि त्या काळातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री ठरली. तिच्याकडे हजारो साड्या, शेकडो जोड्या बूट, तसेच प्रचंड प्रमाणात सोने-चांदी होते. या अभिनेत्री आहेत जयललिता- दक्षिण चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि नंतर तामिळनाडूच्या मुख्यमंत्री. 24 फेब्रुवारी 1947 रोजी कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यात जन्मलेल्या जयललिता लहानपणीच वडिलांना गमावून बसल्या. चेन्नईतील चर्च पार्क स्कूलमध्ये शिक्षण घेतलेल्या जयललिता यांना त्यांच्या आईच्या इच्छेनुसार चित्रपटसृष्टीत पदार्पण करावे लागले, कारण त्यांची आई स्वतःही अभिनेत्री होती.

जयललिता यांनी 1961 मध्ये तमिळ चित्रपट 'एपिस्टल' मधून कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर 1968 मध्ये धर्मेंद्रसोबत हिंदी चित्रपट 'इज्जत' मध्ये काम केले, जो त्यांचा एकमेव हिंदी चित्रपट होता. तमिळ, तेलुगू आणि कन्नड चित्रपटसृष्टीत त्यांनी 300 हून अधिक चित्रपट केले, ज्यांपैकी बरेच चित्रपट सुपरहिट ठरले. त्यांनी एम.जी. रामचंद्रन, शिवाजी गणेशन, एन.टी. रामा राव, अक्किनेनी नागेश्वर राव यांसारख्या दिग्गजांसोबत काम केले. त्यांच्या चित्रपटांमध्ये रोमान्स, ड्रामा आणि अॅक्शनचा अप्रतिम संगम दिसून आला. त्या काळात त्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या आणि लोकप्रिय अभिनेत्री होत्या.

fallbacks

1997 मध्ये चेन्नईतील पोएस गार्डन येथील त्यांच्या घरावर पडलेल्या छाप्यात त्यांच्या अफाट संपत्तीचा खुलासा झाला - 10500 साड्या, 750 चप्पलांचे जोड, 91 घड्याळे, 1250 किलो चांदी आणि 28 किलो सोने. याशिवाय अनेक लक्झरी कार्स आणि मौल्यवान वस्तू होत्या. त्यांच्या एकूण संपत्तीचा अंदाज तब्बल 900 कोटींहून अधिक होता.

हे ही वाचा: विजय देवरकोंडाचा 'साम्राज्य' थिएटरमध्ये प्रदर्शित; चित्रपट पाहाण्याअगोदर वाचा सिनेमाचा रिव्ह्यू

1980 नंतर जयललिता यांनी अभिनयाला निरोप देत राजकारणात प्रवेश केला. एम.जी. रामचंद्रन यांच्या अण्णाद्रमुक पक्षात सामील झाल्यानंतर त्या प्रथम राज्यसभेच्या खासदार आणि नंतर तामिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या. तब्बल सहा वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या जयललिता यांना 'अम्मा' म्हणून लोक ओळखत असत. त्यांच्या कारकिर्दीत अनेक कल्याणकारी योजना राबवल्या गेल्या. 2016 मध्ये जयललिता यांचे निधन झाले. पुढे त्यांच्या आयुष्यावर 'थलाइवी' नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला, ज्यात त्यांची भूमिका कंगना रणौतने साकारली.

Read More