Divya Bharti Death: बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक सुंदर अभिनेत्रींचं वर्चस्व राहिलं आहे. मात्र, दिव्या भारतीची जादूच वेगळी होती. तिच्या एका हास्याने लोक वेडे व्हायचे. तिच्या नवीन चित्रपटांची चाहत्यांना आतुरतेने वाट पाहावी लागायची. दिव्याने खूपच कमी वयात इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं आणि आपली खास ओळख निर्माण केली. मात्र, केवळ अवघ्या 19 व्या वर्षीच तिने जगाचा निरोप घेतला.
दिव्या भारतीने केवळ आपल्या अभिनयाने आणि गोड स्मितहास्याने प्रेक्षकांची मने जिंकली. दिव्याने लहान वयातच मोठं नाव कमावलं होतं.19 व्या वर्षी तिने 21 चित्रपट पूर्ण केले होते. बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत तिने स्थान मिळवलं होतं. पण तिच्या अचानक मृत्यूनं सर्वांनाच हादरवून टाकलं. कोणीतरी ही आत्महत्या असल्याचं म्हटलं, तर काहींनी हत्या असल्याचं सांगितलं. आजही दिव्या भारतीच्या मृत्यूचं कोडं कायम आहे. दिव्याचा मृत्यू कसा झाला हे अद्याप कोणालाच समजलेलं नाही.
मीता भारती यांचा धक्कादायक खुलासा
अलीकडेच अभिनेत्री दिव्या भारती हिच्या आई मीता भारती यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. जो पाहून अनेकांना धक्का बसला. ‘ig_divyabharti’ नावाच्या एका इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये मीता भारती यांनी सांगितलं की दिव्याच्या कुंडलीत 'बालमृत्यू योग' होता हे आधीपासूनच मला माहिती होतं.
त्यामुळे याचा अंदाज आधीच होता. पण त्यांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. मात्र, जेव्हा दिव्याचा मृत्यू झाला तेव्हा त्यांना ती गोष्ट आठवली आणि ते खूप दु:खी झाले. ती भविष्यवाणी खरी ठरली.
दिव्या भारतीच्या कुंडलीमध्ये बाल मृत्यू योग
मीरा भारती म्हणाल्या की, जेव्हा ती 8 वर्षांची होती तेव्हाच तिच्या कुंडलीमध्ये बाल मृत्यूचा योग होता. परंतु कोणीही विचार केला नव्हता की ही भविष्यवाणी खरी ठरेल. दिव्याची 18-19 व्या वर्षी घराच्या खिडकीमधून पडून मृत्यू झाला. मीरा भारती यांच्या मते जे आयुष्यात लिहिलं आहे ते होतं. त्याला कोणीही अडवू शकत नाही असं मीरा भारती म्हणाल्या.