Marathi News> मनोरंजन
Advertisement

'सैयारा' सुपरहिट, रविवारी सर्वाधिक कमाई, 3 दिवसांच्या कमाईने मोडले अनेक रेकॉर्ड

मोहित सूरी यांचा  रोमँटिक ड्रामा चित्रपट 'सैयारा'ने बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यामध्ये प्रचंड कमाई करून रेकॉर्ड बनवला आहे. 

'सैयारा' सुपरहिट, रविवारी सर्वाधिक कमाई, 3 दिवसांच्या कमाईने मोडले अनेक रेकॉर्ड

Saiyaara Box Office Collection Live: मोहित सूरी यांच्या 'सैयारा' या रोमँटिक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड धुमाकूळ घातला आहे. अहान पांडे आणि अनीत पड्डा यांच्या डेब्यू चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांतच तब्बल 83 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा 2025 मधीच एक मोठा यशस्वी चित्रपट ठरतोय असं स्पष्ट होत आहे.

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'सैयारा' चित्रपटाने रविवारच्या दिवशी 37 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.

3 दिवसांमध्ये केली इतकी कमाई

'सैयारा'या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शुक्रवारी 21 कोटी, शनिवारी 25 कोटी आणि रविवारी 37 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने तीन दिवसांमध्ये तब्बल 83 कोटींचा गल्ला जमवला आहे. विशेष म्हणजे रविवारच्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईमध्ये मोठी वाढ झाली.  रविवारच्या दिवशी 37 कोटींचे कलेक्शन करणारा 2025 मधील हा चित्रपट दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 

'सैयारा'चित्रपट का ठरतोय खास?

'सैयारा' चित्रपटामध्ये अहान पांडेने 'कृष कपूर' या एक हटके पण टॅलेंटेड गायकाची भूमिका साकारली आहे. त्याची भेट होते अनीत पड्डा साकारलेल्या 'वाणी बत्रा' या शांत आणि यशस्वी लेखिकेशी. जेव्हा सुर आणि शब्द एकत्र येतात तेव्हा एक जादुई प्रेमकहाणी सुरू होते. हा चित्रपट 18 जुलै रोजी प्रदर्शित झाला आहे.

राजकुमार रावच्या 'मालिक'ची बॉक्स ऑफिसवर घसरण

राजकुमार रावचा 'मालिक' हा चित्रपट 11 जूनला रिलीज झाला आहे. या चित्रपटाची सुरुवात चांगली झाली होती. मात्र दुसऱ्या आठवड्यात प्रवेश करताच कलेक्शनमध्ये घट झाली. गेल्या काही दिवसांत या चित्रपटाला 1 कोटीचा आकडा पार करता आलेला नाहीये. मात्र आठवड्याच्या शेवटी चित्रपटाच्या कमाईमध्ये थोडी वाढ झाली आहे.

दरम्यान 'सैयारा'ने एक जबरदस्त ओपनिंग आठवडा गाठत चित्रपटसृष्टीत नवीन कलाकारांसाठी एक नवीन उदाहरण उभे केले आहे. अहान पांडे आणि अनीत पड्डा यांच्या अभिनयाला मिळत असलेली दाद आणि बॉक्स ऑफिसवरची कमाई पाहता हा चित्रपट या वर्षातील सर्वात मोठ्या हिटपैकी एक ठरू शकतो.

Read More