Marathi News> मनोरंजन
Advertisement

29 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या त्या चित्रपटानं बजेटच्या तुलनेत केली 5 पट दास्त कमाई; तुम्ही ओळखलत का?

This Movie Earned 5 Times more Than Budget : मोठी स्टार कास्ट नसली तरी प्रदर्शित होताच केली बजेटच्या तुलनेत 5 पट कमाई

29 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या त्या चित्रपटानं बजेटच्या तुलनेत केली 5 पट दास्त कमाई; तुम्ही ओळखलत का?

This Movie Earned 5 Times more Than Budget : 90 च्या दशकात मुलांच्या आवडत्या गाण्याविषयी बोलायचं झालं तर त्यात ‘ये तेरी आंखें झुकी झुखी’ हे गाणं आहे. जेव्हा मुलं अंताक्षरी खेळायचे आणि य हे अत्रर आलं तर प्रत्येकाच्या तोंडात सगळ्यात आधी हेच गाणं यायचं. खरंतर, हे गाणं 'फरेब' या चित्रपटातील आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता 29 वर्ष झाली आहेत आणि हा चित्रपट 1996 मध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात कोणता मोठा कलाकार नाही तरी देखील बॉक्स ऑफिसवर त्यानं चांगली कमाई केली होती. 

‘फरेब’ या चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर हा एक सायकोलॉजिकल चित्रपट आहे ज्याची पटकथा ही लोकांना आवडली. तेव्हाच हा चित्रपट कोणत्याही मोठ्या स्टार कलाकाराशिवाय हिट झाली होती आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं बक्कळ कमाई देखील केली. चित्रपटात अनेक गाणी आले पण एक गाणं हे सगळ्यांच्या मनात घर करून गेलं. फरेब या चित्रपटात कोण-कोणते कलाकार दिसले. या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण होते आणि निर्मिती कोणी केली होती. या संबंधीत अनेक प्रश्न उपस्थित झाले असतील त्याविषयी जाणून घेऊया. 

'या' चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन

27 जून 1996 रोजी चित्रपट फरेब प्रदर्शित झाला होता. ज्याचं दिग्दर्शन विक्रम भट्ट यांनी केलं होतं तर निर्मिती ही मुकेश भट्ट यांनी केली होती. चित्रपटाला जतिन-ललित यांनी संगीतबद्ध केलं. फरेब या चित्रपटात फैराज खान, मिलिंद गुनाज, सुमन रंगनाथन, अशोक लथ, विश्वजीत प्रधान आणि सुनील धवन  सारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसले. नेहमीच सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट हे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात आणि फरेब देखील त्यापैकीच एक चित्रपट आहे. Sacnilk प्रमाणे या चित्रपटाचं बजेट हे 1.25 कोटी होतं. तर वर्ल्डवाइड चित्रपटानं 6.20 कोटींचं कलेक्शन केलं होतं. तर भारतात या चित्रपटाची कमाई ही 6.10 कोटी होती. चित्रपट हा हिट ठरला होता. 

हेही वाचा : 'व्हर्जिन पत्नी शोधू नका...'; व्हायरल होणाऱ्या वक्तव्यावर अखेर प्रियांकानं सोडलं मौन म्हणाली, 'हे मी...'

'फरेब' हा चित्रपट कोणत्या ओटीटीवर पाहू शकता? 

'फरेब' या चित्रपटात 6 गाणी आहेत. ज्यापैकी एक ‘ये तेरी आंखें झुकी झुकी’ हे चांगलच गाजलं होतं. खरंतर, याशिवाय ‘ओ हम सफर’, ‘प्यार का मिलना’, ‘प्यार का पहला पहला’ चित्रपटातील ही गाणी देखील त्या काळात चांगलीच गाजली होती. चित्रपटाची पटकथा ही डॉ रोहित वर्मा अर्थात (फराज खान) ची पत्नी सुमन वर्मा (सुमन रंगनाथन) तिच्या आयुष्यात आनंदी असते. पण इंस्पेक्टर इंद्रजीत सक्सेना सुमनवर प्रेम करतो आणि कोणत्याही परिस्थितीत त्याला ती त्याच्या आयुष्यात हवी असते. हा चित्रपट तुम्ही अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर सबस्क्रिब्शनसोबत यूट्युबवर देखील पाहू शकता. 

Read More