Marathi News> मनोरंजन
Advertisement

Sanju सिनेमाची दुसऱ्या दिवशी एवढी कमाई

संजू सिनेमाची कमाई... 

Sanju सिनेमाची दुसऱ्या दिवशी एवढी कमाई

मुंबई : रणबीर कपूरचा 'संजू' हा सिनेमा प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत खेचण्यात यशस्वी ठरला आहे. ओपनिंग डेच्या दिवशी 34.75 करोड रुपये कमाई केलेल्या या सिनेमाचा दुसरा दिवसही खास राहिला आहे. 'संजू' हा सिनेमा leak झाला असला तरीही प्रेक्षकांनी सिनेमागृहातच सिनेमा पाहण्याचा निर्णय घेतला. या सिनेमाने अगदी सुरूवातीपासूनच नवनवे रेकॉर्ड रचण्यास सुरूवात केली. दुसऱ्या दिवशी देखील या सिनेमाने रेकॉर्ड रचला आहे. या सिनेमाने सलमान खानच्या रेस 3 चा रेकॉर्ड देखील मोडला आहे. 

संजूच्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. संजूने रेस 3 चा आणखी एक रेकॉर्ड ब्रेक केला आहे. ट्रेड अॅनालिस्ट रमेश बालाच्या माहितीनुसार, या सिनेमाने दुसऱ्या दिवशी 39 करोड रुपयांची कमाई केली आहे. तर रेस 3 ने दुसऱ्या दिवशी 38.14 करोड रुपयांची कमाई केली आहे. 

शनिवारी संजू सिनेमाने 40.50 करोड रुपये कमाई केली आहे. फायनल आकडेसमोर आले आहेत.

Read More