Tanushree Dutta Video : हिंदी कलाजगतामध्ये #MeToo आंदोलनाची सुरुवात करत आपल्यासोबत गैरव्यवहार झाल्याचे गंभीर आरोप करणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तनुश्रीनं एका व्हिडीओच्या माध्यमातून काही गंभीर आरोप केले असून, तिच्यासोबत मागील 4 ते 5 वर्षांमध्ये नेमकं काय घडत आहे, हे सांगितलं आहे. ओक्साबोक्शी रडणाऱ्या तनुश्रीचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनीसुद्धा चिंता व्यक्त केली आहे.
सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये तनुश्री धाय मोकलून रडत आपल्यावर अन्याय होत असल्याचं सांगत आहे. 'माझ्यावर माझ्याच घरात अन्याय होतोय... मी आताच पोलिसांनासुद्धा फोन लावला. ते आले आणि त्यांनी मला पोलीस स्थानकात येऊन तक्रार दाखल करणयास सांगितलं. मी उद्या किंवा परवा तिथं जाईन. गेल्या 4 ते 5 वर्षांमध्ये मला इतका त्रास देण्यात आला आहे की या साऱ्याचा माझ्या तब्येतीवर परिणाम होतोय, मी सतत आजारी पडतेय. मला काहीही काम करया येत नाहीय', असं तनुश्री या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहे.
घरभर पसारा पडलेल्या पसाऱ्याचा उल्लेख करत मला घरकामासाठी मोलकरीणही ठेवता येत नाहीये. त्यांच्यासोबतचे माझे अनुभव वाईट आहेत, त्या येऊन माझ्या घरातील सामान चोरत असत्यालं सांगत आपण स्वत:च सर्व कामं करत असून एका पेचाच अडकल्याचं तनुश्री हुंदके देत रडताना सांगत आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून तिनं इतरांकडे आपल्या मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहनही केलं.
तनुश्रीनं हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताय त्यावर अनेकांच्याच कमेंट आल्या. जिथं चाहत्यांनी अभिनेत्रीच्या अडचणी समजण्याचा प्रयत्न करत तिला धीर तिला. काहींनी तिला स्वत:वर विश्वास ठेवण्यास सांगितलं.
दरम्यान तनुश्रीनं आजुबाजूच्या कलकलाटासह आणखी एक व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर शेअर केला जिथं, तिनं, आपल्याला 2020 पासून दर दिवशी विचित्र वेळी घराच्या छतावर आणि दाराबाहेर मोठे आवाज ऐकू येत असल्याचं सांगितलं. इमारतीतील कमिटीकडे याबाबतच्या तक्रारी केल्यानंतर आता आपण यापुढे हात टेकल्याचा हतबल सूर तिनं पोस्टच्या माध्यमातून आळवला. हेडफोन लावून, मंत्र ऐकत आपण या प्रसंगाशी दोन हात करत असल्याचं सांगत तनुश्रीनं तिला 'क्रोनिक टायर्डनेस सिंड्रोम' असल्याचं स्पष्ट केलं.