Marathi News> मनोरंजन
Advertisement

श्रीदेवींच्या मृत्यूप्रकरणी हे 5 प्रश्न बोनी कपूर यांच्या अडचणी वाढवणार

बॉलिवूडची सूपरस्टार श्रीदेवी यांच्या निधनाने सगळ्यांच चांगला धक्का बसला आहे. पण आता त्यांच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढत चाललं आहे.

श्रीदेवींच्या मृत्यूप्रकरणी हे 5 प्रश्न बोनी कपूर यांच्या अडचणी वाढवणार

मुंबई : बॉलिवूडची सूपरस्टार श्रीदेवी यांच्या निधनाने सगळ्यांच चांगला धक्का बसला आहे. पण आता त्यांच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढत चाललं आहे.

या संपूर्ण घटनेत असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. ज्यामुळे श्रीदेवींच्या मृत्यू संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

5 प्रश्नांमुळे बोनी कपूर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

पहिला प्रश्न : डॉक्टर्सने असा प्रश्न केला आहे की, जर मृत्यू बाथटब मध्ये पडून झाला आहे तर मग श्रीदेवींच्या शरीरावर जखमा का नाहीत.

दुसरा प्रश्न : श्रीदेवींनी किती ड्रिंक केली होती. ज्यामुळे त्यांचं स्वत:वर नियंत्रण नव्हतं. कारण त्यांचे कौटुंबिक मित्र अमर सिंह यांनी सांगितले आहे की, श्रीदेवी कधीही हार्ड ड्रिंक घेत नव्हत्या.

तिसरा प्रश्न : पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये बाथटबमध्ये डुबून मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे पण बाथटबचा आकार हा स्विमिंगपूल पेक्षा लहानच असतो. माणूस त्यातून उठू शकतो.

चौथा प्रश्न : लग्नसोहळा झाल्यानंतर ही श्रीदेवी दुबईमध्ये का थांबल्या होत्या. त्यांना बहिणीसोबत वेळ घालवायचा होता असं म्हटलं जात होतं पण त्या 48 तासात त्या हॉटेल रुममधून बाहेर पडल्याच नव्हत्या. 

पाचवा प्रश्न : जेव्हा रात्री 9 वाजता श्रीदेवी यांच्यासोबत ही घटना घडली तर संपूर्ण जगासमोर ही घटना मध्यरात्री का आली?

Read More