Marathi News> मनोरंजन
Advertisement

यंदा बॉलिवूडमध्ये या 7 जोड्या करणार पदार्पण

या जोड्या प्रेक्षकांना आवडणार का?

यंदा बॉलिवूडमध्ये या 7 जोड्या करणार पदार्पण

मुंबई : बॉलिवूडमध्ये नवं नव्या जोड्या या प्रेक्षकांच्या भेटीला येतच असतात. बॉलिवूडमध्ये 90 च्या दशकापासून तीन खान यांच राज्य सुरू आहे. सलमान खान, शाहरूख खान आणि आमीर खान या तिघांचे आजही हिट सिनेमे दिले आहेत. मात्र आता बॉलिवूडमध्ये नवा ट्रेंड पाहायला मिळत आहे. या ट्रेंडमध्ये आपल्याला स्टार किड्स बॉलिवूडमध्ये एन्ट्री करताना दिसत आहेत. 2018 मध्ये यंदा 7 नव्या जोड्या बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 

fallbacks

1) जान्हवी कपूर - ईशान खट्टर 

या यादीत पहिली जोडी आहे बॉलिवूडची चांदनी श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर. जी करण जोहरच्या धडक या सिनेमांतून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या सिनेमांत तिच्यासोबत शाहिद कपूरचा लहान भाऊ ईशान खट्टर लीड रोल करत आहे. धडक हा सिनेमा 6 जुलै रोजी रिलीज होत आहे. 

fallbacks

2) सारा अली खान - सुशांत सिंह राजपूत 

अभिनेता सैफ अली खानची मोठी मुलगी सारा अली खान यंदा बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. केदारनाथ या सिनेमांत सारा अली खान पाहायला मिळणार आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत देखील या सिनेमांत लीड रोलमध्ये पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा 30 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 

fallbacks

3) आलिया भट्ट - विक्की कौशल 

राझी या सिनेमांतून दोन वेगवेगळे कलाकार एकत्रसमोर आले आहेत. 11 मे रोजी प्रदर्शित झालेल्या राझी या सिनेमांतून ही जोडी पाहायला मिळाली आहे. 

fallbacks

4) वरूण धवन - अनुष्का शर्मा 

बॉलिवूडमध्ये पहिल्यांदाच अनुष्का शर्मा आणि वरूण धवन एकत्र बघायला मिळणार आहेत. 28 डिसेंबरला सुई धागा हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमांतून पहिल्यांदाच ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

fallbacks

5) ऐश्वर्या राय - राजकुमार राव 

बॉलिवूडमध्ये ऐश्वर्या राय देखील पुन्हा कमबॅक करत आहे. फन्ने खा सिनेमातं ही जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 13 जुलै रोजी फन्ने खा हा सिनेमातून हे दोघं दिसतील. 

fallbacks

6) मोनी रॉय - अक्षय कुमार 

नागिन फेम अभिनेत्री मोनी रॉय हिचं नशिब अगदी पालटल आहे. रेस 3 या सिनेमांत सलमान खानसोबत मोनी रॉय दिसणार आहे. आणि यानंतर अक्षय कुमारसोबत स्पोर्ट बायोपिक गोल्डमध्ये लीड रोल करणार आहे. 15 ऑगस्ट रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 

fallbacks

7) रणवीर सिंह - सारा अली खान 

बॉलिवूड सुपरस्टार रणवीर सिंह पद्मावत सारख्या हिट सिनेमांनतर आता सिम्बामध्ये दिसणार आहे. हा सिनेमा 28 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. सारा अली खान या सिनेमांतून यंदा प्रेक्षकांना दुसऱ्यांदा भेटणार आहे. या सिनेमाला अॅक्शन दिग्दर्शक रोहित शेट्टी दिग्दर्शित करत आहे.  

Read More