Marathi News> मनोरंजन
Advertisement

73 वर्षांपूर्वी परदेशात प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; 17 भाषांमध्ये देण्यात आले सबटायटल्स

73 Years Ago this Indian Movie was Released Worldwide : 73 वर्षांपूर्वी परदेशात प्रदर्शित झाला होता 'हा' भारतीय चित्रपट, 17 भाषांमध्ये सबटायटल्स आणि 28 देशांमध्ये प्रदर्शित 

73 वर्षांपूर्वी परदेशात प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; 17 भाषांमध्ये देण्यात आले सबटायटल्स

73 Years Ago this Indian Movie was Released Worldwide : आज बॉक्स ऑफिस खूप मोठी गोष्ट झाली आहे. एक चित्रपट येतो जो फक्त देशात नाही तर परदेशातही प्रदर्शित होतो. इतकं नाही तर हे फक्त हिंदी भाषेपर्यंत मर्यादीत नाही तर इतर भाषिक चित्रपटांविषयी देखील आहे. चित्रपट मोठ्या प्रमाणात आणि भव्यतेनं प्रदर्शित होत आहेत. त्या सगळ्याचा थेट परिणाम हा त्यांच्या कमाईवर होतो. परदेशातील मार्केट सुरु झाल्यामुळे 100 कोटींचा गल्ला करणं ही काय मोठी गोष्ट नाही आहे. तुम्हाला वाटत असेल की परदेशात चित्रपट प्रदर्शित होण्याची सुरुवात आता झाली असेल. पण हे आज सुरु झालेलं नाही, तर खूप आधी झालेलं आहे. आज आपण जाणून घेऊया की कोणता पहिला भारतीय चित्रपट होता जो वर्ल्डवाइड प्रदर्शित झाला होता. 

जगभरात प्रदर्शित झालेला पहिला भारतीय हिंदी चित्रपट

आता तुम्ही विचार करत असाल की हा शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान किंवा अमिताभ बच्चन यांचा असेल. हे नसले तर दुसरे काही कलाकार अर्थात विनोद खन्ना किंवा कोणी असेल. पण तुम्हाला पण हेच वाटत असेल तर तुमचा अंदाज हा चुकिचा आहे. पहिला भारतीय चित्रपट जो वर्ल्डवाइड अनेक देशांमध्ये प्रदर्शित झाला त्या चित्रपटाचं नाव 'आन' आहे. हा चित्रपट 1952 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात दिलीप कुमार आणि निम्मी लीड महत्त्वाच्या भूमिकेत होत्या. 

हेही वाचा : ना शाहरुख, ना रजनीकांत 'या' भारतीय अभिनेत्याच्या आयुष्यावर कॅनडात सुरु झाला अभ्यासक्रम; पाहा सिलॅबस

तुम्हाला विचार करूण आश्चर्य होत असेल की हे कसं शक्य आहे. तर हे खरं आहे की जगभरात सगळ्यात आधी कोणता भारतीय चित्रपट प्रदर्शित झाला तर तो 1952 मध्ये झाला होता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटाला 17 वेगवेगळ्या भाषांचं सबटायटल देण्यात आले आणि हा चित्रपट जवळपास 28 देशांमध्ये प्रदर्शित झाला. महबूब खान यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटानं परदेशात खूप चांगलं प्रॉफिट कमावलं होतं. असं असलं तरी त्यावेळी प्रत्येक चित्रपट हा वर्ल्डवाइड प्रदर्शित होत नव्हता. मात्र, आज सहजपणे कोणताही चित्रपट वर्ल्डवाइड प्रदर्शित करण्यात येतो. त्यामुळे 1952 च्या काळत कोणता चित्रपट हा वर्ल्डवाइड तो ही 28 देशांमध्ये आणि 17 भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता. 

Read More