Marathi News> मनोरंजन
Advertisement

Aai Kuthe Kai Karte : घटस्फोटानंतर अरूंधतीमध्ये मोठा बदल? होतेय चर्चा

अरूंधतीचं आयुष्य घटस्फोटानंतर बदलणार? 

Aai Kuthe Kai Karte : घटस्फोटानंतर अरूंधतीमध्ये मोठा बदल? होतेय चर्चा

मुंबई : स्टार प्रवाहवरील मालिका 'आई कुठे काय करते' सध्या प्रेक्षकांच्या लोकप्रिय मालिकेच्या यादीत नव्वल आहे. या मालिकेच्या आताच्या एपिसोडने सगळ्यांनाच धरून ठेवलं आहे. मालिकेतील आताचा प्लॉट सगळ्यांच्याच डोळ्यांच्या कडा भिजवत आहे. सौ. अरूंधती अनिरूद्ध देशमुख ही ओळख पुसून आता अरूंधती फक्त 'अरूंधती' या नव्या ओळखीसोबत जगासमोर येणार आहे. (Aai Kuthe Kai karte fame Arundhati Aka Madhurani Prabhulkar New Look after Divorce )

अरूंधती ही पात्र साकारणारी गोड अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर प्रेक्षकांची लोकप्रिय अभिनेत्री आहे. मधुराणीने तिच्या खासगी आयुष्यात केलेला कोणताही बदल चाहते अरूंधतीच्या जीवनाशी संबंधित समजतात. तसंच आता काहीसं झालं आहे. 

fallbacks

अरूंधती म्हणजे मधुराणीने आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केलीय. यामध्ये तिने आपला नवा लूक शेअर केलाय. मधुराणीने हेअर कट केलाय. याचे फोटो तिने आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केलेत. तिचा हा लूक नक्कीच वेगळा आहे. पण सोशल मीडियावर अशी चर्चा आहे की, मधुराणीने हा नवा लूक अरूंधतीसाठी म्हणजे मालिकेसाठी केला आहे. त्यामुळे या लूकची जास्त चर्चा आहे. 

'आई कुठे काय करते' मालिकेत अरूंधती आणि अनिरूद्धने घटस्फोटाच्या पेपरवर सही केली आहे. आता हे दोघं कायमचे वेगळे झालेत. अरूंधती आतापर्यंत कधीच ठाम नव्हती. पण वेगळं होण्याच्या निर्णयावर मात्र ती ठाम होती. घटस्फोटानंतर आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची आहे. हा निश्चय तिने केला आहे. या दृष्टीकोनातून लूक बदलणं हे तिचं पहिलं पाऊल तर नसेल ना? अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

अरूंधतीच्या जाण्याने देशमुख कुटूंब आणि समृद्धी बंगला कसा असेल? याबाबत आता प्रेक्षकांना उत्सुकता आहे. तसेच अरूंधतीचं एकटीच आयुष्य कसं असेल? याबाबतही उत्सुकता आहे. 

Read More