Marathi News> मनोरंजन
Advertisement

आई कुठे काय करते : ... तर मी हिला आयुष्यातून उठवेन, Mission Ankita सुरू

अंकिताचा खोटेपणा येणार का समोर? 

आई कुठे काय करते : ... तर मी हिला आयुष्यातून उठवेन, Mission Ankita सुरू

मुंबई : 'आई कुठे काय करते' मालिकेत दररोज नव नव्या गोष्टी घडत आहेत. संजनाला घराबाहेर काढण्यासाठी आजी चक्क शेखररावांना फोनकरून बोलवते. शेखर मी संजनाला इथून घेऊन जाईन, असा शब्द आजी आणि अरूंधतीला देतो. (Aai Kuthe Kai Karte : Yash, Abhishek start Mission Ankita ) पण या दरम्यान त्याची अंकिताशी गाटभेट होते. यशसोबत बोलताना अंकिता हे प्रकरण काय आहे? याचा अंदाज शेखरला येतो. 

यश आणि शेखरच्या बोलण्यातून अंकिताचं सत्य जाणून घेण्याची उत्सुकता समोर येते. याच दरम्यान अंकिता आपल्या मम्मीशी बोलत असते. यावेळी अभिषेक मुंबईत गेल्यावर हॉस्पिटलमधून सत्य जाणून घेण्यास उत्सुक असल्याचं समोर आलं आहे. यामुळे अंकिता चांगली घाबरली आहे. हा सगळा प्रकार आपल्या आईला सांगताना यश तेथे उभा असतो. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

यश अंकिताचं सगळं बोलणं ऐकतो. यशला आलेल संशय आणखीनच दाट होतो. यश यासंदर्भात अभिषेकशी बोलायचं ठरवतो. अभिषेकला या गोष्टी सांगितल्यावर त्याचा संशय ही अधिक घट्ट होतो. अभिषेक म्हणतो की,'अंकिताच्या खोटेपणामुळे जर मी अनघाला गमावलं असेन. तर मी हिला आयुष्यातून उठवेन.'

यानंतर अभिषेक आणि यश 'मिशन अंकिता' सुरू करणार. यामध्ये त्यांच्यासोबत शेखर असेलच यात शंका नाही. देशमुखांच्या घरी एका बाजूला अंकिता तर दुसऱ्या बाजूला संजना. नक्की पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

अभिषेकनं लग्न करावं म्हणून अंकितानं आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र अंकितानं खरंच आत्महत्येचा निर्णय घेतला होता की नाटक रचलं होतं याचा तपास आता अभिषेक करणार आहे. अंकिताचा खोटारडेपणा उघड झालाच तर तिला घरातून बाहेर निघण्याची सक्त ताकीदही त्याने दिलीय. त्यामुळे ‘आई कुठे काय करते’ मालिकेचे भाग दिवसेंदिवस उत्कंठावर्धक होत आहेत.

Read More