Marathi News> मनोरंजन
Advertisement

आलियाने घेतली दीपिकाची जागा रणवीर सिंगसोबत...

जर आपण बॉलिवूडमधील सध्याच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीबद्दल बोललो तर त्यात आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोण ही नावं सगळ्यात आधी घेतली जातात. 

  आलियाने घेतली दीपिकाची जागा रणवीर सिंगसोबत...

मुंबई : जर आपण बॉलिवूडमधील सध्याच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीबद्दल बोललो तर त्यात आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोण ही नावं सगळ्यात आधी घेतली जातात. याचबरोबर, दीपिका पदुकोण संदर्भात बऱ्याच दिवसांपासून बातम्या येत होत्या की, ती पती रणवीर सिंगसोबत संजय लीला भन्साळी यांच्या 'बैजू बावरा' चित्रपटात दिसू शकते.

त्याचबरोबर आता या सगळ्या बातम्यांवर ब्रेक आला असून, बैजू बावरा सिनेमाला अभिनेत्री मिळाली आहे. या चित्रपटात आलिया भट्टला रणवीरसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. अलीकडेच दोन्ही स्टार्सना करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटासाठी देखील कास्ट करण्यात आलं होतं, या  सिनेमाचं शूटिंग सुरू झालं आहे.

fallbacks

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही जोडी एकत्र दोन चित्रपट करणार आहे, त्यामुळे 'बैजू बावरा' सिनेमाचं ऑक्टोबरमध्ये शूट करण्याचं नियोजन केलं जात आहे. संजय लीला भन्साळींचा हा चित्रपटही भव्य असेल आणि त्यासाठी गोरेगावमध्ये एक प्रचंड सेट उभारला जात आहे. यासाठी रणवीर आणि आलियाला 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चं शूट ऑक्टोबरच्या आधी पूर्ण करावं लागेल जेणेकरून ते बैजू बावराला पूर्ण वेळ देऊ शकतील.

Read More