Marathi News> मनोरंजन
Advertisement

'1.5 वर्ष रोज दारू प्यायलो'; पहिल्या पत्नीसोबत विभक्त झाल्यानंतर आमिरनं केलेला आत्महत्येचा प्रयत्न

Aamir Khan : आमिर खाननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पहिली पत्नी रीना दत्तासोबत विभक्त झाल्यानंतर त्याची अवस्था कशी झाली होती यावर खुलासा केला आहे. 

'1.5 वर्ष रोज दारू प्यायलो'; पहिल्या पत्नीसोबत विभक्त झाल्यानंतर आमिरनं केलेला आत्महत्येचा प्रयत्न

Aamir Khan : बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि रीना दत्ताची लव्ह स्टोरी ही एकासर्वसामान्य बॉलिवूड रोमान्सनं सुरु झाली होती. दोघं हे मुंबईत शेजारी होते आणि ते एकमेकांना खिडकीतून पाहायचे. त्यानंतर त्यांचा रोमान्स सुरु झाला. रीना सुरुवातीपासून तिला यात काही जास्त इन्ट्रेस्ट नाही असं वागत होती. पण अखेर वयाच्या 19 व्या वर्षी ती आमिरसोबत रिलेशनशिपमध्ये आली. त्यानंतर 1986 मध्ये त्यांनी लग्न केलं. 16 वर्ष त्या दोघांनी सुखी संसार केला आणि त्यानंतर ते विभक्त झाले. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आमिरनं सांगितलं की कशा प्रकारे त्यानं स्वत: ला नुकनान पोहोचवण्याचा प्रयत्न केला. 

लोकांना भेटणं टाळायचा

आमिर खाननं नुकतीच 'द लल्लनटॉप'ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यानं रीना दत्तासोबत घटस्फोटानं त्याच्यावर खूप परिणाम केला होता. त्यानं सांगितलं की माध्यमांपासून वेगळं राहणं खूप कठीण होतं. या समस्येला तोंड देण्यासाठी, तो लोकांना भेटणे टाळायचा आणि आपल्या भावनांवर कंट्रोल करण्यासाठी दारूची मदत घ्यायचा.

रीनापासून विभक्त झाल्यानंतरची आमिरची अवस्था

त्याच्या या भावनात्मक संघर्षाविषयी बोलताना आमिरनं सांगितलं की 'जेव्हा ज्या संध्याकाळी रीना आणि मी वेगळे झालो, तेव्हा मी दारूची एक बॉटल संपवली आणि पुढचे 1.5 वर्षे मी रोज दारू पित होतो. मी कधीच झोपलो नाही. दारू पिऊन मी बेशुद्ध व्हायचो. मी स्वत: चा जीव घेण्याचा प्रयत्न करायचो.' 

काम करणं टाळलं

या दरम्यान, आमिरनं काही काळासाठी चित्रपटात काम करणं बंद केलं कारण तो कोणत्या क्रिएटिव्ह कामावर लक्ष केंद्रित करू शकत नव्हता. पण सत्य परिस्थिती ही आहे की त्याच्या जीवनात चढ-उतार येत होते, कारण लगान देखील त्याचवेळी प्रदर्शित होत होता. त्यावेळी आणखी एका गोष्टीविषयी बोलताना आमिर म्हणाला, जेव्हा एका मोठ्या प्रकाशनानं त्याच्यासाठी 'मॅन ऑफ द ईयर' या नावानं एक लेख प्रकाशित केला. त्यावेळी तो त्याच्या भावनात्मक दु:खातून बाहेर येण्यासाठी संघर्ष करत होता. 

'मॅन ऑफ द ईयर, आमिर खान' 

आमिरनं सांगितलं की 'मी त्यावेळी काम देखील करत नव्हतो. ना मला कोणाला भेटायची इच्छा होती आणि त्याच वर्षी लगाननं 'मॅन ऑफ द ईयर, आमिर खान' या नावानं वृत्तपत्रात एक लेख प्रकाशित केला. मला हे थोडं विचित्र वाटलं.' 

1999 मध्ये सिमी ग्रेवालला दिलेल्या मुलाखतीत आमिर खाननं त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. जेव्हा त्याला प्रेमाच्या नावावर करण्यात आलेल्या एका कामाविषयी सांगण्यास सांगितलं. त्यावेळी त्यानं आठवण केलं की रीनासोबत त्याच्या रोमान्सच्या काळात त्यानं एकदा तिच्यासाठी स्वत: च्या रक्तानं एक पत्र लिहिलं होतं. मात्र, त्यावर त्यानं हे देखील सांगितलं की आज या गोष्टीचा विचार केला तर हे चुकीचं आहे आणि नाटक करण्यासाठी केलं होतं. 

हेही वाचा : नग्नतेविरोधात कोणी बोलत का नाही? सरकारनं...; अश्लील ड्रेसिंगमुळे खुशी मुखर्जीवर भडकली अभिनेत्री

याशिवाय रीनाला अशा प्रकारे पत्र लिहिणं आवडलं नव्हतं. त्याविषयी बोलत आमिरनं सांगितलं की स्वत: च्या रक्तान रीनासाठी पत्र लिहिणं म्हणजे अशाच प्रकारे प्रेम साध्य करण्याचा हा योग्य पर्याय होता. पण लवकरच त्याला या गोष्टीची जाणीव झाली की प्रेमात इतकी हद्द पार करणं गरजेचं नाही. 

Read More