Marathi News> मनोरंजन
Advertisement

आमिर खानचा हा अवतार पाहिला का?

कोणत्या सिनेमासाठी केलाय हा लूक 

आमिर खानचा हा अवतार पाहिला का?

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमीर खानने 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' या सिनेमातून जरी प्रेक्षकांना नाराज केलं असलं तरी मिस्टर परफेक्शनिस्ट आपल्या खाजगी आयुष्यात सगळ्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा आमिर खान शुटिंग करत असतो तेव्हा तो स्वतःला त्यामध्ये पूर्णपणे बिझी ठेवतो. 

पण जेव्हा तो कुटुंबासोबत असतो तेव्हा तो पूर्णपणे कुटुंबाचा असतो. नुकताच आमिर खानने सोशल मीडियावर एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये आमिर आपली पत्नी किरण राव आणि मुलगा आझादसोबत मस्तीच्या मूडमध्ये आहे. आमिर खान आणि पत्नी किरण रावचा हा अवतार आझादच्या थीम पार्टीकरता आहे. हा क्षण त्यांनी अतिशय एन्जॉय केला आहे. आमिर खान स्वतः या मुलांसोबत लहान मूलं बनले आहेत. 

आमिर खानचे हे फोटो बघून तुम्हाला वाटेल की, तो कोणत्यातरी कार्टून कॅरेक्टरची नक्कल करत आहे. आमिर फ्रेंच कॉमिक कॅरेक्टर Obelix बनला असून तो ब्लू आणि व्हाइट रंगाची पँट घातली आहे. आणि त्यामध्ये खूप हवा भरली आहे. सोबतच त्याने राक्षसांची टोपी घातली असून एक सुंदर असा कुत्रा हातात घेतला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Obelix, Dogmatix, Asterix and Getafix the druid! #aamirkhan #kiranrao

A post shared by Aamir_khan_2014 (@aamir_khan_2014) on

तर किरण राव देखील अशीच मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. किरण सफेद कपडे घालून हातात हत्यार घेऊन Getafix अवतारात दिसत आहे. 

Read More