Marathi News> मनोरंजन
Advertisement

लेकीच्या साखरपुड्यात Aamir Khan चा भन्नाट डान्स; Video Viral

लेकीच्या लग्नात आमिर खानचा डान्स पाहिल्यानंतर तुम्ही देखील म्हणाल, 'क्या बात है...'  

लेकीच्या साखरपुड्यात Aamir Khan चा भन्नाट डान्स; Video Viral

Aamir Khan Dance  at daughter engagement :  अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान आणि बॉयफ्रेंड नुपूर शिखरेने शुक्रवारी साखरपुडा करत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला. सध्या आयरा आणि नुपूरच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. आतापर्यंत समोर आलेल्या व्हिडीओमध्ये आयरा आणि नुपूरकडे सर्वांच्या नजरा वळल्या. पण आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आमिर खान चर्चेचा विषय ठरत आहे. 

आमिर खानचा भन्नाट डान्स 

आयराच्या साखरपुड्यातील एक व्हिडीओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. व्हिडीओमध्ये आमिर खान भन्नाट डान्स करताना दिसत आहे. वडिलांना आपल्या साखरपुड्यात आनंद साजरा करताना पाहून आयरा देखील प्रचंड आनंदी दिसत आहे. पाहा आमिर खानचा भन्नाट डान्स... 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आयरा खान आणि नुपूर शिखरेचा शुक्रवारी मुंबईत साखरपुडा पार पडला. या सोहळ्याला अनेक पाहूणे उपस्थित होते. या खास सोहळ्याला आयराचं संपूर्ण कुटुंबही उपस्थित होतं. वडील आमिर खान, आई रीना दत्ता (Reena Dutta), आजी, भाऊ आणि काकू व्यतिरिक्त, किरण राव (Kiran Rao) ने देखील साखरपुड्यात हजेरी लावली. 

कोण आहे नुपूर शिखारे ?
नूपुर शिखारे आमिर खानचा फिटनेस कोच आहे. रिपोर्टनुसार लॉकडाऊनच्या काळात जेव्हा इराने स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला. तेव्हा इरा आणि नुपुर यांच्यातील नातं फुललं. त्यानंतर त्यांच्या नात्याची चर्चा सर्वत्र पसरू लागली.  

 

Read More