Marathi News> मनोरंजन
Advertisement

आमिर खानच्या मुलीनं देहविक्री करणाऱ्यांबद्दल ‘हे’ काय म्हटलं..?

आमिरच्या लेकिनं पुन्हा एकदा अतिशय संवेदनशील मुद्द्यावर तिचं मत मांडलं आहे... 

आमिर खानच्या मुलीनं देहविक्री करणाऱ्यांबद्दल ‘हे’ काय म्हटलं..?

मुंबई : ‘परफेक्शनिस्ट’ हे विशेषण गेल्या कैक वर्षांपासून ज्याच्या नावाआधी लावलं जातं आणि ज्याच्या वर्तणुकीतूनही हाच स्वभाव झळकतो असा एक अभिनेता म्हणजे आमिर खान. समाजात असणआरं आमिरचं स्थान तसं मानाचं. अशा या कलाकाराच्या कुटुंबीयांनीही  कायमच सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत.

यामध्ये आमिरची लाडकी लेक, आयरा हिसुद्धा आघाडीवर आहे. आयरा कायमच विविध मुद्द्यांवर तिचे विचार मांडताना दिसते. इतकंच काय तर ती संवेदनशील विषयांवरही तितकीच मनमोकळेपणाने व्यक्त होताना दिसते.

एकाएकी आयराच्य स्पष्टवक्तेपणाची होणारी चर्चा ही तिच्या एका नव्या पोस्टमुळं सुरु आहे. आयरानं नुकताच गंगुबाई काठियावाडी हा चित्रपट पाहिला. ज्यानंतर तिनं देहविक्री करणाऱ्या महिलांबाबतचा आपला विचार समाजापुढे ठेवला.

‘तुम्ही जो अत्याचार सहन केला आहे, त्यामुळं तुम्ही होणाऱ्या अत्याचाराविरोधात उभं राहण्याची इच्छाशक्ती बाळगता. तुम्ही एखादं मोठं वादळ आणि अडचणीही ओलांडू शकता. पण, तरीही तुम्ही देहविक्री वैध केलेली नाही’, असं म्हणत तिनं समाजाला खडबडून जागं केलं आहे.

गंगुबाईनं जे काही केलं त्याला समाजात स्थान मिळालं, तिच्या कामाची पोचपावती आही मिळत आहे. तुम्ही तुमच्या कामांचा आनंद साजरा करण्यास पात्र आहात का? असा सवालही तिनं या पोस्टच्या माध्यमातून विचारला.

fallbacks

आलिया भट्टची (Alia Bhatt) मुख्य भूमिका असणाऱ्या ‘गंगूबाई काठियावाडी’ (gangubai kathiawadi) हा चित्रपट पाहिल्यानंतर आयरानं तिच्या मनातील भावना शब्दांवाटे व्यक्त केल्या आणि नेटकऱ्यांच्या नजरा वळवत त्यांना विचार करायला भाग पाडलं. हीच खरी सोशल मीडियाची ताकद... नाही का ?

Read More