Marathi News> मनोरंजन
Advertisement

आमिर खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; फातिमा सना शेख आणि अभिनेता पुन्हा एकत्र

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. कधी तो त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असतो तर कधी तो त्याच्या प्रोफेशनल लाईफमुळेदेखील चर्चेत असतो.

आमिर खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी;  फातिमा सना शेख आणि अभिनेता पुन्हा एकत्र

मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान 'सितारे जमीन पर' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. काही दिवसांपूर्वी त्याने खुलासा केला होता की, तो त्याच्या आगामी चित्रपटाच्या निर्मितीसोबतच अभिनयाचीही तयारी करत आहे. या चित्रपटाशिवाय आमिरकडे अनेक चित्रपट आहेत. निर्माता म्हणून आमिरने नवीन प्रोजेक्ट लॉक केला आहे. वृत्तानुसार, तो त्याची 'दंगल' को-स्टार फातिमा सना शेखसोबत दिसणार आहे. तर पुन्हा एकदा हे दोघं एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत.

फातिमा आमिरच्या चित्रपटात दिसणार आहे
आमिर खान आणि फातिमा सना शेख यांनी 2016 साली 'दंगल' चित्रपटात स्क्रीन शेअर केली होती. जो त्या वर्षातील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक होता. आता एका रिपोर्टनुसार, आमिर खानने त्याच्या पुढील प्रोडक्शन प्रोजेक्टसाठी फातिमा सना शेखला साइन केलं आहे. सध्या या चित्रपटाचं शीर्षक निश्चित झालेलं नाही. या चित्रपटात फातिमासोबत अनेक कलाकार दिसणार आहेत.

अद्वैत चंदन या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे
यासोबतच सिक्रेट सुपरस्टार दिग्दर्शक अद्वैत चंदन यांनाही या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी आणण्यात आलं आहे. आमिर खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तो शेवटचा करीना कपूर खानसोबत 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटात दिसला होता. 'लाल सिंग चड्ढा' सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला मिळाला. या चित्रपटानंतर तो आता 'सीतारे जमीन पर'मधून पुनरागमन करणार आहे. 

आमिर-जेनेलिया पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार 
'सीतारे जमीन पर' हा स्पॅनिश हिट चित्रपट कॅम्पिओन्सचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात आमिरसोबत अभिनेत्री जेनेलिया देशमुख दिसणार आहे. दोन्ही स्टार्स पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. आमिरच्या 'तारे जमीन पर' या सुपरहिट चित्रपटाचा हा रिमेक असणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

आमिरने यापूर्वी फातिमाला मल्याळम चित्रपट 'जया जया जया हे'च्या हिंदी रिमेकसाठी साइन केलं होतं. मात्र हा प्रोजेक्ट यशस्वी झाला नाही आणि काही काळानंतर अद्वैत चंदन एक मनोरंजक स्क्रिप्ट घेऊन आला. आमिर आणि फातिमा दोघांनाही ही स्क्रिप्ट आवडली आणि लगेचच दिग्दर्शकाला या दोघांनी ग्रीन सिग्नल दिला.  फातिमा नित्या मेहरासोबतची पहिली वेब सीरिज संपल्यानंतर या चित्रपटासाठी शूटिंग सुरू करणार आहे.

Read More