Aamir Khan Home : मायानगरी मुंबईनं आजवर अनेकांनाच आसरा दिला असून, यामध्ये कलाकारांपासून ते सर्वसामान्य नागरिकांचाही समावेश आहे. मुळात मुंबईची मायानगरी ही ओळख या शहरात असणाऱ्या कलाजगताशी संबंधित असून, इथं अनेक सेलिब्रिटींची घरंही आहेत. (Mumbai high profile area) मुंबईतील वांद्रे, लोखंडवाला, मलबार हिल, वरळी सी फेस या आणि अशा अनेक उच्चभ्रू भागांमध्ये सेलिब्रिटी मंडळींची मोठाली घरं असून, कायमच चाहत्यांची या मंडळींची घरं दुरूनच पाहणं म्हणजे कुतूहलाचा विषय.
उच्चभ्रू वस्ती, कोट्यवधींच्या किमती आणि विचारही करता येणार नाही इतकी मोठी घरं आणि त्यांच्या घरांमधील एकंदर सजावट पाहिली, की डोळे दीपून जातात आणि मग हे आलिशान जगणं पाहताना प्रत्येकांनाच हेवा वाटतो. आमिर खानसुद्धा मुंबई शहरात मागच्या कैक वर्षांपासून मुक्कामी असणारा एक कमाल अभिनेता.
बॉलिवूडच्या या परफेक्शनिस्ट अभिनेत्याची या शहरात एक नव्हे तर स्वत:च्या मालकीची तब्बल 12 घरं आहेत. मात्र हा अभिनेता इतकी घरं असतानाही आता म्हणे चक्क भाडेतत्त्वावरील घरात राहण्यास गेला आहे. त्यामागं नेमकं कारण काय? हाच प्रश्न आता चाहते विचारू लागले आहेत.
फोर्ब्सच्या यादीमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार आमिर खानच्या एकूण संपत्तीचा आकडा आहे 1862 कोटी रुपये. पण, तरीही सध्या तो वांद्रे पश्चिम इथं एका भाड्याच्या घरात राहण्यास गेला असून, त्यानं पाली हिल्स इथं 4 फ्लॅट भाड्यानं घेतले आहेत. यासाठी आमिर 24.5 लाख रुपये प्रतिमहिना इतकी रक्कम मोजतो. उपलब्ध माहितीनुसार दरवर्षी 5 टक्के व्याजदरानं आमिर भरत असणाऱ्या या भाडेतत्त्वाच्या रकमेत वाढ होत राहील.
Zapkey.com च्या माहितीनुसार आमिरनं पाली हिलमध्ये भाड्यानं घेतलं असून, त्यानं पुढील पाच वर्षांसाठी हे फ्लॅट भाड्यानं घेतले असून, 2030 पर्यंत आमिर तिथंच राहणार आहे. भाडेतत्त्वाच्या करारानुसार यामध्ये 45 महिन्यांच्या लॉक इन पिरियडचा समावेश असून, या व्यवहारासाठी आमिरनं 1.46 कोटींहून अधिक रकमेचं सिक्युरिटी डिपॉझिट, 4 लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी आणि 2000 रुपये नोंदणी फी रक्कम भरली आहे.
आमिर खाननं एकाएकी भाड्याच्या घरात राहण्याचा निर्णय घेतला असला तरीसुद्धा त्याच्याकडे स्वत:च्या मालकीचे एकदोन नव्हे, तर तब्बल 12 फ्लॅट असून, त्याच्या या फ्लॅटमध्ये हाय प्रोफाईल रिडेवलपमेंटचं काम सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. आमिरचे हे फ्लॅट हाय प्रोफाईल अल्ट्रा प्रिमियम सी फेसिंग रेसिडेंसच्या अनुषंगानं तयार केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. या कामानंतर आमिरच्या या फ्लॅटची रक्कम साधारण 100 कोटींहूनही अधिक वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे.