Marathi News> मनोरंजन
Advertisement

झी मराठीवर सूत्रसंचालन करणार आमीर खान

मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमीर खान. 

झी मराठीवर सूत्रसंचालन करणार आमीर खान

मुंबई : मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमीर खान. 

आता आपल्याशी चक्क मराठीत संवाद साधणार आहे. आमीर खान लवकरच एका मराठी शोचं सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. आमीर खान मराठी शिकत असल्याचं आपण अनेकदा ऐकलं आहे. 

आमीर खानचा मराठी शो 

झी मराठीवर अभिनेता आमीर खान लवकरच एक मराठी शो घेऊन येत आहे. या शोची अधिकृत घोषणा होणार आहे. आमीर खानच्या या नव्या शोचं नाव गुलदस्त्यात ठेवलं आहे. आमीर खान या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. आमीर खान मराठी भाषेचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेत असल्याचं त्याने अनेकदा सांगितलं आहे. चांगल मराठी बोलता आल्याशिवाय आपण मराठीत संवाद साधणार नाही असं देखील तो म्हणाला होता. 

आमीर खानची पत्नी किरण राव ही सत्यमेव जयतेच्या माध्यमातून पाणी फाऊंडेशनकरता 'तूफान आलया' हे गाणं मराठीत गायलं होतं. मराठीतील सुपरस्टार गायक अजय गोगावलेसोबत किरण रावने हे गाणं गायलं होतं. या गाण्याला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली होती. 

त्याचप्रमाणे पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात आमीर खान अनेक शब्द मराठीत बोलाताना दिसला. आता संपूर्ण मराठी असा नवा कोरा शो घेऊन आमीर खान आपल्या भेटीला येत आहे.  

 

Read More