Marathi News> मनोरंजन
Advertisement

अबब!!!..'लालसिंग चड्ढा' सिनेमासाठी आमिरने घेतलं 'एवढं' मानधन...'परफेक्शनिस्ट'ची बातच न्यारी

'लालसिंग चड्ढा' हा सिनेमा कलाकारांसोबत त्यांच्या मानधनावरूनही चर्चेत आहे. या सिनेमासाठी आमिर खाननं घेतलेलं मानधन रेकॉर्डब्रेक आहे. 

अबब!!!..'लालसिंग चड्ढा' सिनेमासाठी आमिरने घेतलं 'एवढं' मानधन...'परफेक्शनिस्ट'ची बातच न्यारी

मुंबईः बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हा त्याच्या सिनेमांबाबत फारच चोखंदळ आहे. 3 ते 4 वर्षात आमिर एकच सिनेमा करतो मात्र त्या सिनेमाची प्रचंड चर्चा होते आणि बॉक्स ऑफिसवरही सिनेमा मोठी कमाई करतो. त्यामुळे भारंभार सिनेमे करण्यापेक्षा एकाच सिनेमावर आमिर स्वतःला पूर्ण झोकून देतो.

fallbacks

आमिर खानचा आगामी 'लालसिंग चड्ढा' हा सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. आमिर खानसह करिना कपूर या सिनेमात झळकणार आहे. हा सिनेमा आता प्रदर्शनासाठीही तयार आहे.

fallbacks

अनेक वेळा सिनेमा रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती मात्र आता अखेर 11 ऑगस्टला हा सिनेमा रिलीज होत आहे. अभिनेता नागा चैतन्य ही या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

fallbacks

'लालसिंग चड्ढा' हा सिनेमा कलाकारांसोबत त्यांच्या मानधनावरूनही चर्चेत आहे. या सिनेमासाठी आमिर खाननं घेतलेलं मानधन रेकॉर्डब्रेक आहे. जे पाहून कोणाचेही डोळे गरगरतील.

fallbacks
आमिरने सिनेमासाठी तब्बल 50 कोटींचं मानधन घेतलं आहे. आमिर त्याच्या सिनेमासाठी स्वतःला झोकून देतो. या सिनेमातही आमिरचा वेगळा लूक पाहायला मिळणार आहे.

fallbacks

करिना कपूरही मानधनाच्या बाबतीत मागे नाही. करिनानं या सिनेमासाठी 8 कोटींचं मानधन घेतलं आहे. या सिनेमात करिना आमिरच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. यात करिना सिंपल लूकमध्ये दिसणार आहे. सेटवरून बाहेर पडल्यानंतर नुकताच करिनाचा हा लूक समोर आला होता.

fallbacks

साऊथ स्टार नागा चैतन्य या सिनेमातून हिंदी सिनेमात डेब्यू करतोय. नागा चैतन्यनं या सिनेमासाठी 6 कोटींचं मानधन घेतल्याची माहिती मिळते आहे.

Read More