Marathi News> मनोरंजन
Advertisement

Aamir Khan घटस्फोटानंतर देखील 'या' कामासाठी एक्स पत्नीसोबत

घटस्फोटानंतर आमिर खान आणि एक्स पत्नीचा व्हिडीओ व्हायरल, 'या' कामासाठी पुन्हा आले एकत्र   

Aamir Khan घटस्फोटानंतर देखील 'या' कामासाठी एक्स पत्नीसोबत

मुंबई : बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेला अभिनेता आमिर खान कायम त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. कधी आमिर स्वतःच्या नात्यामुळे चर्चेत असतो, तर कधी मुलगी आयरा खानच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असतो. आता देखील आमिर त्याच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आला. सध्या आमिर आणि त्याची एक्स पत्नी किरण राव यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दोघे एका महत्त्वाच्या कामासाठी एकत्र आल्याचं दिसत आहे. 

घटस्फोट झालं असलं तरी आमिरसाठी कुटुंब नेहमीच प्राधान्य राहिले आहे. आमिरने आई झीनतचा वाढदिवस  मोठ्या थाटामाटात साजरा केला. आमिरच्या आईच्या वाढदिवसाचा एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडीओ पाहून तुम्हाला देखील कळेल की वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यात तो साजरा केला. यावेळी आमिरसोबत त्याची एक्स पत्नी किरण आणि मुलगा आझादही दिसले. कुटुंबातील इतर अनेक सदस्यही दिसत आहेत. 

व्हिडीओमध्ये, प्रत्येकजण 'हॅपी बर्थडे टू यू' गाणे म्हणत आहे आणि आमिरची आई झीनत केक कापताना दिसत आहे. सध्या खान कुटुंबाचा खास फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

Read More