Aamir Khan on Getting Married at Young Age : बॉलिवूड अभिनेता आमिर खान हा त्याच्या कामासोबत त्याच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आहे. दोन वेळा घटस्फोट झाल्यानंतर आमिर खान हा पुन्हा एकदा रिलेशनशिपमध्ये आला आहे. तो आता गौरी स्प्रॅटसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. नुकतीच त्यानं एका पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी आमिरनं त्यानं आयुष्यात केलेल्या चुकांविषयी सांगितलं. त्यानं म्हटलं की त्यानं लग्न करण्याची खूप घाई केली आणि त्याला या गोष्टीचा पश्चाताप आहे.
आमिर खाननं राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये चित्रपटांशिवाय त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टी अर्थात प्रेम, कुटुंब आणि आयुष्यात घेतलेल्या त्यांच्या निर्णयांवरून आणि चुकांविषयी वक्तव्य केलं आहे. आमिरनं यावेळी त्याच्या आयुष्यातील सगळ्यात मोठ्या चुकीविषयी विचारलं तर उत्तर देत तो म्हणाला की त्यानं अनेक चुका केल्या आहेत. आमिरनं सांगितलं की तो आज जो काही त्यानं केलेल्या चुकांमुळे आहे.
आमिरनं मग पुढे रीना दत्तासोबत आपल्या लग्नावर चर्चा केली आणि घाईत लग्न केल्याचा पश्चाताप असल्याचं म्हटलं. त्यावेळी रीना ही 19 वर्षांची होती आणि आमिर हा 21 वर्षांचा होता. तो म्हणाला, 'आयुष्यात मी एक नाही तर अनेक चुका केल्या आहेत. मला वाटतं की आज मी जो काही आहे, तो फक्त आपल्या यशामुळे नाही तर माझ्या चुकांमुळे आहे. आता मी फक्त एक सोपी गोष्ट सांगेन. रीना आणि मी लग्नाची खूप घाई केली. मी 21 वर्षांचा होतो आणि ती 19 वर्षांची होती. पण लीगली जो पहिला दिवस होता, मी लग्न करण्यासाठी होतो तो दिवस म्हणजे 14 मार्च, जेव्हा मी 21 वर्षांचा झालो. तर त्यानंतर एका महिन्याची नोटिस दिली. तर त्यानंतर जो पहिला दिवस होता. ज्या दिवशी माझ्या आणि रीनाचं लग्न हे लीगली होणं शक्य होतं. तो दिवस म्हणजे 18 एप्रिल आणि आम्ही 18 एप्रिल रोजी लग्न केलं. त्याआधी आम्ही दोघं एकमेकांना फक्त 4 महिन्यांपूर्वी ओळखत होतो. त्यातही आम्ही एकमेकांसोबत खूप कमी वेळ व्यथीत केला होता. आमच्या मनात एकमेकांसाठी खूप प्रेम होतं. त्यामुळे आम्ही लग्न देखील केलं.'
आमिरनं पुढे सांगितलं, 'मात्र, आज जेव्हा मी पाहतो तर इतकी घाई नाही करायला नको. लग्नासारखा मोठा निर्णय हा विचार करून घ्यायला हवा. तरुण असताना त्या जोशमध्ये तुम्हाला अनेक गोष्टी कळत नाही. पण नंतर तुम्हाला ही जाणीव होते, रीनासोबत माझं आयुष्य चांगलं होतं. तर त्यातून तुम्ही हा अर्थ काढू नका की रीना चुकीची होती. माझं हे मुळीच म्हणणं नाही.'
पुढे आमिर म्हणाला, 'रीना ही खूप चांगली व्यक्ती आहे. आम्ही लोकं एका पद्धतीनं एकत्र मोठे झालो. आम्ही इतके छोटे होतो की जेव्हा आम्ही लग्न केलं. तेव्हा रीना आणि मी एकमेकांचा खूप आदर करायचो. आमच्या मनात एकमेकांसाठी खूप प्रेम आहे. पण कोणीच लग्नाची इतकी घाई करायला नको, ते देखील इतक्या कमी वयात, इतक्या घाईत इतका मोठा निर्णन घ्यायला नको. पण जर मी ते केलं नसतं, तर आज मी तुमच्यासमोर बसलो नसतो.'
हेही वाचा : 1 वर्षात 34 चित्रपट, 25 ब्लॉकबस्टर इतर सुपरहिट; कोणी मोडू शकला नाही 'या' सुपरस्टारचा रेकॉर्ड
पुढे रीनासोबतच्या घटस्फोटावर बोलताना आमिर म्हणाला, 'एक जे कारण आहे असं वाटतं ते हे आहे की मी माझ्या चित्रपटांमध्ये खूप गुंतलेलो असायचो आणि हे सत्य आहे. मी वर्कहॉलिक होतो. आधी मी खूप इमोशनल होतो, आता सुधारलोय. आधी जर मला कोणी काही बोललं किंवा दु:खी केलं तर मला वाईट वाटायचं. मी 3-4 दिवस कोणाशी बोलायचो नाही.'