Marathi News> मनोरंजन
Advertisement

PK मध्ये कसा शूट झाला 'तो' न्यूड सीन! खुलासा करत आमिर म्हणाला, 'कॅप लावून...'

Aamir Khan on PK Nude Scene : बॉलिवूड अभिनेता आमिर खाननं कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली त्यावेळी त्यानं PK मध्ये कसा शूट झाला 'तो' न्यूड सीन!

PK मध्ये कसा शूट झाला 'तो' न्यूड सीन! खुलासा करत आमिर म्हणाला, 'कॅप लावून...'

Aamir Khan on PK Nude Scene : बॉलिवूड अभिनेता आमिर खाननं 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये दिसला. या एपिसोडमध्ये आमिरनं त्याच्या करियरविषयी मोकळेपणानं वक्तव्य केलं आणि त्याच्या आयुष्यातील काही मजेशीर गोष्टी सांगितल्या आहेत. त्यापैकी एक म्हणज पीके या चित्रपटातील न्यूड सीन. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान, त्याला कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला आणि स्वत: च्या भीतीवर कसा ताबा आणला याविषयी सांगितलं. 

कपिल शर्मान यावेळी आमिरला विचारलं की त्याला कधी पीकेच्या न्यूड सीनच्या शूटिंग दरम्यान, तो रेडिओ असंतुलित होण्याची भीती वाटत होती का? त्यावेळी आमिर जोरात हसला आणि त्यामागची कहाणी सांगितली त्याशिवाय त्यानं हा सीन लिहिण्यासाठी कथालेखन करणाऱ्यांना सगळे श्रेय दिले कारण त्यामुळे आमिर सुद्धा गोंधळला होता की हा सीन कसा शूट करायचा. आमिर म्हणाला, त्यानं आश्चर्य व्यक्त करत जेव्हा या सीनविषयी राजकुमार हिरानी यांना विचारलं की या सीनसाठी त्याला कपड्यांशिवाय दाखवण्याचा विचार करत आहेत का? तर त्यावर उत्तर देत राजकुमार हिरानी यांनी त्याला वचन दिले की या सीनसाठी एक स्पेशल शॉट्स बनवण्यात येईल, पण ती फक्त समोरच्या भागाला लपवू शकेल, पाठची बाजू नाही. याविषयी समजवण्यासाठी राजकुमार हिरानी यांनी क्रिकेट मॅच दरम्यान, घालण्यात येणाऱ्या एका गार्डचं उदाहरण दिलं.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या सीनची शूटिंग राजस्थानमध्ये काही ठरावीक लोकांच्या उपस्थितीत शूट करण्यात आला. दिग्दर्शकांनी शूटिंग दरम्यान, मोबाइल वापरण्यावर बंदी घातली होती. या सीनविषयी सांगत आमिर पुढे म्हणाला, जोपर्यंत त्यानं चालणं सुरु केलं नाही, तो पर्यंत सगळं ठीक होतं. पण जेव्हा तो धावू लागाला, तर हे खूप विचित्र झालं होतं. सीनमध्ये त्याला उत्साहानं पळायचे होते, पण जेव्हाही तो धावण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा Abdominal Cap ही त्याच्या जागेवरून खाली पडायची कारण ती टेपच्या मदतीनं लावली होती. 

हेही वाचा : 'जुनं फर्निचर' चित्रपटात एकनाथ शिंदे? 'या' कलाकाराला ओळखलंत का?

दोन-तीन प्रयत्न केल्यानंतर त्यानं राजकुमार हिरानी यांनी सीन संपवण्यास सांगितले. त्यानंतर रेडियोशिवाय स्वत: चा एक बेस्ट शॉट देण्यासाठी त्यानं कॅपला एका बाजूला ठेवसे आणि धावू लागला. त्यानं हे देखील सांगितलं की या सीनच्या शूटिंग दरम्यान, त्याला तोपर्यंत लाज वाटली, जोपर्यंत त्याला या गोष्टीची जाणीव झाली नाही की त्याला त्याचा बेस्ट शॉट द्यायचा आहे. 

Read More