Marathi News> मनोरंजन
Advertisement

दोन घटस्फोट झाल्यानंतर Aamir Khan पहिल्या प्रेमाच्या आठवणीत

दोन लग्न अपयशी ठरल्यानंतर आमिरला का सतावतेय पहिल्या प्रेमाची आठवण?   

दोन घटस्फोट झाल्यानंतर Aamir Khan पहिल्या प्रेमाच्या आठवणीत

मुंबई : बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान कायम चर्चेत असतो. चाहत्यांना देखील आमिरच्या आगामी सिनेमांबद्दल उत्सुकता असते. आमिर त्याच्या प्रोफेशनल नाही तर खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत अभिनेता कायम कुटुंबाला वेळ देत असतो. दोन घटस्फोट झाल्यानंतर देखील मुलांची काळजी मात्र आमिर कायम करताना दिसतो. दोन लग्न अपयशी ठरल्यानंतर अभिनेत्या पहिल्या प्रेमाची आठवण आली आहे. 

आमिरचं पहिलं प्रेम
नुकताचं 'फिर ना ऐसी रात आएगी'  गाणं लॉन्च झालं, यावेळी गाण्याची थीम लक्षात घेत आमिरला त्याच्या पहिल्या प्रेमाची आठवण आली. अभिनेत्याने सांगितले की, एक काळ होता जेव्हा मी टेनिस खेळायचो, ती देखील माझ्यासोबत त्याच क्लबमध्ये होती.  एक असा दिवस आला तेव्हा मला कळलं की तिने तिच्या कुटुंबासह देश सोडला आहे. 

अभिनेता पुढे म्हणाला, 'त्यावेळी मला खूप दुःख झालं. ती मला आवडत होती ही गोष्ट तिला ठाऊक नव्हती. त्यात एकच गोष्ट चांगली होती की मी चांगला टेनिसपटू झालो. नंतर काही वर्षांनी मी राज्यस्तरीय स्पर्धेत टेनिस खेळलो आणि राष्ट्रीय स्तरावर चॅम्पियन झालो.

आमिरचा आगामी सिनेमा
आमिर खान आगामी सिनेमा 'लाल सिंह चड्ढा'च्या प्रदर्शनासाठी सज्ज आहे. अद्वैत चंदन दिग्दर्शित सिनेमा 11 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. या सिनेमात आमिरशिवाय करीना कपूर खान, नागा चैतन्य आणि मोना सिंग हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

 

Read More