Marathi News> मनोरंजन
Advertisement

आमिर खानच्या दोन्ही पूर्वाश्रमीच्या पत्नींनी केलं ईदचं खास सेलिब्रेशन; किरण राव आणि रीना दत्ताचा सेल्फी VIRAL

Aamir Khan's Ex Wife Celebrate Eid Together : आमिर खानचे आणि त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

आमिर खानच्या दोन्ही पूर्वाश्रमीच्या पत्नींनी केलं ईदचं खास सेलिब्रेशन; किरण राव आणि रीना दत्ताचा सेल्फी VIRAL

Aamir Khan's Ex Wife Celebrate Eid Together : बॉलिवूड अभिनेता आमिर खाननं काल त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत ईद साजरी केली. यावेळी त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी किरण राव आणि रीना दत्ता देखील पोहोचल्या होत्या. त्यांच्या या ईदच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. खरंतर किरण रावनं आमिरची पहिली पत्नी रीना दत्तासोबत सेल्फी शेअर केला आहे. या ईदच्या पार्टीमध्ये आमिरची मुलं आजाद आणि आयरा देखील दिसले आणि त्यांच्यासोबत आमिरचा जावई आणि आयराचा नवरा नुपूर शिखरे देखील दिसला. 

किरण रावनं ईदच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत किरण रावनं कॅप्शन दिलं की 'अम्मीच्या घरी ईदचं सेलिब्रेशन, ती सगळ्यात चांगली आणि सुंदर होस्ट आहे. कुटुंब, मित्रांसोबतच सेलिब्रेशन आणि नेहमीच सगळ्यात चांगली पार्टी असते. मला आशा आहे आणि मी प्रार्थना करते की हे वर्ष आपल्या सगळ्यांसाठी सगळ्यांत चांगलं आणि आनंदी जावो.'

किरणनं आमिर खानची आई जीनत हुसैन यांचा पहिला फोटो शेअर केला आहे. त्यांच्या घरीत ईदचं हे सेलिब्रेशन होतं. आमिरची दोन्ही बहिणी यावेळी तिथे पोहोचल्या होत्या. आमिरची लेक आयरा तिचा नवरा नुपूर शिखरे आणि सासू देखील आली होती. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kiran Rao (@raodyness)

हेही वाचा : ऐश्वर्या राय-अभिषेकचा नवा VIDEO समोर; वागणूक पाहून नेटकरी म्हणाले 'एकमेकांकडे त्यांनी... '

 

दरम्यान, आमिरनं त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी गौरी स्प्रॅटविषयी खुलासा केला. ते दोघं लग्न करणार नाही याविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण ते दोघ एकमेकांनी बऱ्याच काळापासून डेट करत आहेत. गौरीला एक मुलगा देखील आहे. दरम्यान, आता सोशल मीडियावर आमिरचा त्याचा मुलगा जुनैद खान आणि आजाद रावसोबतचा व्हिडीओ व्हायरल होतोय. किरण रावनं त्याच्यासोबतचा कोणता फोटो शेअर केला नसला तरी देखील आजाद आणि जुनैद खानचा त्याच्यासोबतचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याची काही माहित नसून हा व्हिडीओ राजकुमार संतोषी यांच्या घराच्या आवारातील असल्याचं म्हटलं जातं. आमिर इथे असतानाच त्याच्या दोन्ही पूर्वाश्रमीच्या पत्नी या त्याच्या घरी ईदचं सेलिब्रेशनसाठी पोहोचल्या होत्या. 

Read More