Marathi News> मनोरंजन
Advertisement

पैसे कमवत नाही याचं आयरा खानला दु:ख; तर आमिर खाननं लेकीला दिला 'हा' मोलाचा सल्ला

Aamir Khan : आमिर खान आणि आयरा खान यांनी एका मुलाखतीत याविषयी बोलताना दिसले. 

पैसे कमवत नाही याचं आयरा खानला दु:ख; तर आमिर खाननं लेकीला दिला 'हा' मोलाचा सल्ला

Aamir Khan : बॉलिवूड अभिनेता आमिर खान हा नेहमीच त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. तर सध्या आमिर चर्चेत येण्याचं कारण म्हणजे त्याची लेक आयरा खान. आयरा खानला या गोष्टीचं वाईट वाटतं की ती पैसे कमावत नाही आणि आयुष्यात ती काहीच करत नाहीये. तिनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं की ती 26-27 वर्षांची असून ती काहीच करत नाही. त्यावरआमिर खानचं काय म्हणणं आहे याविषयी त्यानंच सांगितलं आहे.

आयरा खान आणि आमिर खाननं 'पिंकविला' ला दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टी सांगितल्या. आयरानं म्हटलं की माझ्या वडिलांनी माझ्यावर... मी 26-27 वर्षांची आहे. तरी माझ्यावर खूप खर्च केला आहे आणि मी जगातली काम नसलेली व्यक्ती आहे. मी काहीच करत नाहीये. इतकं ऐकताच आमिरनं त्याची प्रतिक्रिया देत सांगितलं की तिचं म्हणणं आहे की पैसे कमावत नाही. त्यावर होकार देत आयरा पुढे म्हणाली, अगत्सु सुरु करण्या आधी पैसे कमवायचे नाही, काही असं ठोसं असं न करणं आहे. 

हेही वाचा : 102 वय असताना सुद्धा केलं काम; शाहरुख, सलमान आणि रणबीर कपूरसोबत काम करणारी ही अभिनेत्री माहितीये का?

आमिर खाननं सांगितलं, 'काही लोकं, त्यांना काम येतं आणि ते लोकं त्या बदल्यात पैसे आकारतात. जोपर्यंत मी लोकांच्या कामी येतो आणि त्या बदल्यात मी पैसे घ्यायचे की नाही ती वेगळी गोष्ट आहे. तुम्ही लोकांच्या कामी यायला हवं. हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं.' आमिरनं त्याची लेक आयराला सांगितलं की 'तू इतक्या लोकांची मदत करतेस. एक वडिलाच्या रुपात माझ्यासाठी हे खूप आहे. तू पैसे कमावतेस की नाही, ते माझ्यासाठी काही महत्त्वाचं नाही. तू काम चांगलं करतेस ना हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे.'
 

आमिरनं पुढे सांगितलं की 'मी इराला सांगितलं की तुम्हाला तुमच्या आयुष्याचा अर्थ समजणं महत्त्वाचं आहे आणि तुमच्या लोकांच्या कामी सुद्धा यायला हवं. त्यानं आयराला हा विश्वास दिला की तिचे आई-वडील हे आर्थिक रित्या सशक्त आहेत आणि त्यामुळे नोकरी करून पैसे कमावण्या ऐवजी अगत्सुवर फोकस करायला हवं.' दरम्यान, आयरा खान हे मानसिर आरोग्य आणि कल्याण संगठण 'अगत्सु' ची संस्थापक आणि सीईओ आहे. 

Read More