Marathi News> मनोरंजन
Advertisement

स्वत: च्याच चित्रपटात रिजेक्ट झाला होता आमिर खान; आता ऑडिशनचा VIDEO होतोय VIRAL

Aamir Khan Laapataa Ladies Audition : आमिर खाननं त्याच्या युट्यूब अकाऊंटवरून त्याच्या ऑडिशनचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. 

स्वत: च्याच चित्रपटात रिजेक्ट झाला होता आमिर खान; आता ऑडिशनचा VIDEO होतोय VIRAL

Aamir Khan Laapataa Ladies Audition : किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटानं प्रेक्षकांची मने जिंकली. आमिर खाननं देखील या चित्रपटासाठी ऑडिशन दिलं होतं. त्याची एक क्लिप आता शेअर करण्यात आली असून सगळीकडे या क्लिपची चर्चा सुरु आहे. आमिर खाननं सब इन्स्पेक्टर श्याम मनोहरच्या भूमिकेसाठी हे ऑडिशन दिलं होतं. पण रवी किशनं ही भूमिका त्याच्या पेक्षा जास्त चांगल्या प्रकारे साकारली असं सगळे म्हणतं आहेत. 

आमिर खाननं नुकतंच त्याचं युट्यूब चॅनल सुरु केलं आहे. आमिरच्या या युट्यूब चॅनलचं नाव Aamir Khan Talkies असं आहे. यावर त्यानं अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यापैकी त्यानं शेअर केलेल्या या व्हिडीओंमध्ये एक हा AKP च्या कास्टिंगचा आहे. यात आमिर खान इन्स्पेक्टर मनोहरच्या भूमिकेसाठी ऑडिशन देताना दिसला. या व्हिडीओला पाहून लोकं खूप प्रतिक्रिया देत आहेत आणि आमिरसोबत रवि किशनची देखील तुलना केली आहे. खरंतर रवि किशननं या चित्रपटात पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. एकानं आमिरची स्तुती करत लिहिलं की कोणीही इतर भारतीय सेलिब्रिटी मग ते छोटे असो किंवा मग मोठे सेलिब्रिटे ते त्यांच्या अपयशी किंवा वाईट ऑडिशनचा व्हिडीओ शेअर करत नाहीत. त्यांना सगळ्यांना खूप अ‍ॅटिट्यूड आहे. हेच कारण आहे की आमिर कान सगळ्यांना आवडतो. हे फक्त यासाठी नाही की त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय करतील किती पैसे कमावतील. हा चित्रपट आणि ही पटकथा आहे ज्यासाठी तो इतकी मेहनत घेतो. 

हेही वाचा : 'सिकंदर'ची अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच बक्कळ कमाई! दोन दिवसात 1 लाख तिकिटांची विक्री

आणखी एका नेटकऱ्यानं लिहिलं की 'आमिर मला प्रचंड आवडतो पण मला या गोष्टीचा पण आनंद आहे की आमिरला माहित होती की 'लापता लेडीज' मध्ये मनोहरच्या भूमिकेत रवी योग्य अभिनेता आहे. सगळ्यात उत्तम.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'रवि किशन नक्कीच उत्तम पर्याय होता. त्यानं त्याची भूमिका अगदी योग्य प्रकारे साकारली.'
 

दरम्यान, 'लापता लेडीज' चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर या चित्रपटानं नितांशी गोयल, प्रतिभा रांटा, स्पर्श श्रीवास्तव, छाया कदम आणि रवि किशन दिसले होते. चित्रपटाचं बजेट हे 4-5 कोटी होतं आणि चित्रपटानं 25 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. 

Read More