Marathi News> मनोरंजन
Advertisement

घटस्फोटानंतर आमिरची अवस्था झाली अशी की विचीत्र अवतारात फिरताना दिसला अभिनेता !

बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा काहि महिन्यांपूर्वीच घटस्फोट झाला आहे.

घटस्फोटानंतर आमिरची अवस्था झाली अशी की विचीत्र अवतारात फिरताना दिसला अभिनेता !

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा काहि महिन्यांपूर्वीच घटस्फोट झाला आहे.  या सिंगलपणाची झलक त्याच्या ड्रेसिंग सेन्समध्ये पाहायला मिळत आहे. आमिर खानला नुकतच स्पॉट करण्यात आला आणि यावेळी अभिनेत्याचा लूक पाहून सगळेच दंग झाले. आमिर खान नुकताच त्याची पहिली पत्नी रीनाच्या घराबाहेर दिसला. यादरम्यान अभिनेत्याचा लूक पाहून सर्वजण थक्क झाले. त्याने खूप सैल कपडे घातले होते. पिवळ्या शर्ट आणि हॅरेम पॅन्टमध्ये आमिर अगदी खुल्या स्टाईलमध्ये दिसत आहे. त्याची स्टाईल पाहून लक्षात येतं की त्याच्या आयुष्यात आरामाचं स्थान किती आहे.

जुलैमध्ये घटस्फोट झाला
आमिर खानने या वर्षी जुलैमध्ये पत्नी किरण रावपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. परस्पर संमतीने हा निर्णय घेण्यात आला. 28 डिसेंबर 2005 रोजी त्याने दुसरं लग्न केलं. लग्नानंतर दोघांनी एकत्र अनेक चित्रपट केले. त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली होती. या दोघांना एक मुलगा देखील आहे, ज्याचं नाव आझाद राव खान आहे. त्यांचं निवेदन देताना दोघांनी आमचे व्यावसायिक संबंध कायम राहतील असं सांगितलं होतं. याशिवाय आम्ही मिळून मुलाची काळजी घेऊ.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आमिरचा आगामी चित्रपट
आमिर खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच त्याच्या आगामी 'लाल सिंह चढ्ढा' या चित्रपटात दिसणार आहे. करीना कपूर खान देखील या चित्रपटाचा एक भाग आहे. हा हॉलिवूड चित्रपट 'फॉरेस्ट गंप'चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात हॉलिवूड अभिनेता टॉम हँक्स मुख्य भूमिकेत दिसला होता. लाल सिंग चढ्ढा हा चित्रपट गेल्यावर्षी प्रदर्शित होणार होता, मात्र लॉकडाऊनमुळे शूटिंग पूर्ण होऊ शकलं नाही. आता हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.

Read More