Marathi News> मनोरंजन
Advertisement

आमिर खानच्या मुलाने वजन असं घटवलंय की तुम्ही ओळखूच शकत नाहीत, आमीर खानचा मुलगा कोण?

आमिर खानचा मुलगा जुनैद खान लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार 

 आमिर खानच्या मुलाने वजन असं घटवलंय की तुम्ही ओळखूच शकत नाहीत, आमीर खानचा मुलगा कोण?

मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा मुलगा जुनैद लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. आता अॅक्टींगमध्ये तो किती सरस आहे, हे त्याचा सिनेमा आल्यावरच कळू शकेल. मात्र त्याने या सिनेमासाठी त्याचा पूर्णपणे लूक बदलून टाकला आहे. नुकताच जुनैद वडील आमिर आणि बहिण इरा खानसोबत स्पॉट झाला होता. यावेळी त्याचा हा लूक पाहून सगळेच हैराण झाले.

हेल्दी असलेल्या जुनेदनं स्वत:चं वजन आगामी सिनेमासाठी घटवल्याचं पाहायला मिळत आहे. या सिनेमासाठी त्यांने मिशीदेखील वाढवली आहे. स्पॉट झालेल्या जुनेदनं मास्क काढत पोझ दिल्या त्याचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

जुनेदन त्याच्या या लूकसाठी बरीच मेहनत घेतल्याचं दिसत आहे. प्रत्येकजण जुनैदचे हे फोटो पाहून सरप्राईज होत आहे. जुनैदच्या बॉडी ट्रांसफोर्मेशन नंतर अनेकजण त्याच्या सिनेमासाठी उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे. फॅट टू फिट हा जुनैदचा लूक आर्कषणाचा विषय ठरतोय.

लाइमलाईटमध्ये कधी पुढे नं येणारा जुनैद बॉडी ट्रांसफोर्मेशनमुळे टॉक ऑफ द टाउन बनला आहे. याआधी तो हेल्थी लूकमध्येच समोर आला आहे. एका स्पेशल कारणानं जुनैदचा हा लूक पहिल्यांदा समोर आला आहे.

या तिघांना मुंबईच्या एका रस्त्यावर स्पॉट केलं गेलं. आमिरनं कॅज्युल कपडे परिधान केले होते. तर जुनैदनं ग्रीन शेडची पॅन्ट आणि डार्क कलरचा टीशर्ट परिधान केला होता. या दोघांसोबत इरादेखील स्पॉट झाली. इराने पिवळ्या रंगाचा टी-शर्ट  आणि ब्लॅक शॉर्ट्स परिधान केली होती.

जुनैद लवकरच सिद्धार्थ पी मल्होत्रा यांच्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे. याच्यासोबत या सिनेमात शालिनी पांडे, शरवरी वाघ आणि जयदीप अहलावत हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.  या सिनेमात जुनैद पत्रकार करसनदास मुल्जी यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा १८६२ सालच्या एका सत्यघटनेवर आधारित आहे.

Read More