Marathi News> मनोरंजन
Advertisement

जेव्हा आमिरच्या दोन पत्नी एकत्र येतात...

बॉलिवूडचा मि.परफेक्शनिस्ट आमिर खानने त्याच्या चित्रपटातून, विचारातून, सामाजिक कार्यातून त्याचे वेगळेपण सिद्ध केले आहे.

जेव्हा आमिरच्या दोन पत्नी एकत्र येतात...

मुंबई : बॉलिवूडचा मि.परफेक्शनिस्ट आमिर खानने त्याच्या चित्रपटातून, विचारातून, सामाजिक कार्यातून त्याचे वेगळेपण सिद्ध केले आहे. आपल्या सर्वांनाच माहित आहे की, आमिरने दोन लग्न केली, त्याची पहिली पत्नी रीना दत्ता आणि दुसरी अर्थात किरण राव. एकाच नवऱ्याच्या दोन बायका म्हणजे सवती कधी चांगल्या मैत्रिणी झाल्याचे तुम्ही पाहिले आहे का? नाही ना.

त्यातही साधले वेगळेपण

पण यातही आमिर खानने आपले वेगळेपण साधले आहे. दोघींमधील समतोल त्याने इतका परफेक्ट साधलाय की त्या दोघीतही चांगली मैत्री असल्याचे दिसून येते. पाणी फाऊंडेशनने नुकतीच एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्या परिषदेला रिना दत्ता आणि किरण राव दोघी एकत्र दिसल्या. खरंतर त्यांच्यातील मैत्रीच कार्यक्रमाचे आकर्षण ठरली, असे म्हणायला हरकत नाही. त्यांनी कॅमेऱ्याला एकत्र पोजही दिली. 

आमिरची दोन लग्न

आमिर आणि रीना दत्ता यांचे १८ एप्रिल १९८६ ला लग्न झाले होते. पण १५ वर्षांपूर्वी दोघांनी सहमताने घटस्फोट घेतला. त्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री आहे. त्या दोघांना इरा आणि जुनैद ही दोन मुले असून त्यांचा सांभाळ रीनाचं करते. घटस्फोटानंतर २८ डिसेंबर २००५ मध्ये आमिर आणि किरण राव यांनी विवाह केला. त्या दोघांना आझाद हा मुलगा आहे. 

Read More