Marathi News> मनोरंजन
Advertisement

...म्हणून आनंद आहुजा रिसेप्शनला दिसला स्पोर्टशूजमध्ये

या स्पोर्ट्स शूजची सध्या सोशल मीडियावर जास्त चर्चा आहे. 

...म्हणून आनंद आहुजा रिसेप्शनला दिसला स्पोर्टशूजमध्ये
मुंबई : सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्या लग्नाची चर्चा सध्या सोशल मीडियावर आहे. सोनम आणि आनंद यांनी घातलेल्या कपड्यांपासून ते बॉलीवूडकरांनी लावलेली हजेरी आणि केलेलं नृत्य या सगळ्यांच्या लक्षात राहिलं. दरम्यान आणखी एका गोष्टीने सर्वांच लक्ष वेधून घेतलय. जर तुम्ही बारकाईने या दोघांच्या रिसेप्शनचे फोटो पाहिलेत तर एक गोष्ट तुमच्या नक्की धान्यात आली असेल. आनंद आहुजा काळ्या रंगाच्या शेरवानीसोबत स्पोर्ट्स शूज घालून दिसला. या स्पोर्ट्स शूजची सध्या सोशल मीडियावर जास्त चर्चा आहे. 

पाच रुपये देण्यास नकार ?

आनंदने स्पोर्ट्स शूज का घातले असावेत यावर अनेकजण आपले तर्क-वितर्क लढवत आहेत. 'काहीपण पेहराव' करण्याची आपली आवड आनंद पूर्ण करत असल्याचे काहींचे म्हणणे आहे. बुट चोरण्याच्या रिती रिवाजानंतर आनंदने खुशी आणि जान्हवीला पाच रुपये देण्यास नकार दिला आणि त्याला शूज परत मिळाले नाहीत. म्हणून रिसेप्शनच्या वेळेस त्याला स्पोर्ट्स शूज घालावे लागल्याचे म्हटले जात आहे. 

लग्नातून पळून ?

आनंद आहुजा लग्नातून पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे मतही एकाने मिश्किलमध्ये मांडले आहे. तर एका युजरने लिहिले सोनम कपूरची ड्रेसिंग आणि मेकअप एका बाजुला आणि आनंदचे स्पोर्ट्स शूज दुसऱ्या बाजुला. 

ब्रांड प्रमोशन 

आनंद आहुजाचे दिल्लीमध्ये स्पोर्ट शूजचे बुटीक आहे. इंस्टाग्रामवर तो आपल्या स्पोर्ट शूजचे अनेक फोटो अपलोड करत असतो. आनंदचे दिल्लीत वेज-नॉनवेज नावाचे मल्टी ब्रांड स्नीकर बुटीकदेखील आहे. तसेच तो शाही एक्सपोर्टचा मॅनेजिंग डायरेक्टरदेखील आहे. याचा वर्षाचा ३ हजार कोटी रुपयांचा टर्नओव्हर आहे. अशावेळी त्याच्या ब्रांडच्या प्रमोशनचा हा एक भाग असल्याचेही म्हटले जात आहे.
Read More