Marathi News> मनोरंजन
Advertisement

'आशिक बनाया आपने' फेम तनुश्री दत्ता आता अशी दिसते...

'आशिक बनाया आपने' फेम तनुश्री दत्ता आता कशी दिसते माहित आहे? 

'आशिक बनाया आपने' फेम तनुश्री दत्ता आता अशी दिसते...

मुंबई : 'आशिक बनाया आपने' फेम तनुश्री दत्ता आता कशी दिसते माहित आहे? काही वर्षांपूर्वीच तनुश्रीने बॉलिवूडला रामराम ठोकला. त्यानंतर ती फारशी लाईमलाईटमध्ये आली नाही. मात्र आता दोन वर्षांनी ती भारतात परतली आहे. पण एकेकाळी बोल्ड, सेक्सी दिसणाऱ्या या अभिनेत्रीला आता ओळखणंही कठीण होत आहे.

ही भारतवारी कशासाठी?

काही वर्षांपासून अमेरिकेत राहत असणारी तनुश्री दत्ता बहिणीच्या लग्नासाठीही भारतात आली नाही. मग आता तिचे असे भारतात परतणे, सर्वांना आश्चर्याचा धक्का आहे. ढोल’, ‘गुड बॉय बॅड बॉय’, ‘रोक’, ‘अपार्टमेंट’ या सिनेमातून तनुश्री प्रेक्षकांच्या भेटीला आली. मात्र तिचे हे सिनेमे फारशी कमाल करु शकले नाहीत. मग या अपयशानंतर तनुश्रीने बॉलिवूडला गुड बाय म्हटले. 

fallbacks

 

Will miss USA...be back soooon!!!

A post shared by Tanushree Dutta (@iamtanushreeduttaofficial) on

आता काय करते तनुश्री?

मिस इंडिया युनिव्हर्स किताब पटकावलेली तनुश्री आता अध्यात्माकडे वळल्याच्या चर्चा आहेत. काही वर्षांपूर्वी शांततापूर्ण आयुष्याच्या शोधात तिनं लडाखमधल्या मठातही काही दिवस घालवले होते. त्यानंतर अमेरिकेत स्थिरावलेली तनुश्री ही भारतवारी सर्वांनाच आश्चर्यात टाकत आहे. 

fallbacks

Read More