Marathi News> मनोरंजन
Advertisement

ईशा गुप्ताचा सगळ्यात वेगळा अंदाज पाहून चाहते हैराण; पाहा फोटो

बाबा निरालासोबतचे इंटिमेट सीन आणि तिच्या बोल्ड इमेजमुळे ईशा गुप्ता सतत चर्चेत असते. 

ईशा गुप्ताचा सगळ्यात वेगळा अंदाज पाहून चाहते हैराण; पाहा फोटो

मुंबई : 'आश्रम 3' रिलीज होण्याआधी आणि नंतर सर्वत्र एकच नाव चर्चेत आहे आणि ते नाव आहे ईशा गुप्ता. बाबा निरालासोबतचे इंटिमेट सीन आणि तिच्या बोल्ड इमेजमुळे ईशा गुप्ता सतत चर्चेत असते. दरम्यान, ईशा गुप्ताने असा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये तिचा लूक तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

असा फोटो काशीतून शेअर केला आहे
ईशा गुप्ताने तिचा काशीमधला ताजा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये ईशा गुप्ता लाल रंगाचा सूट परिधान करुन काशी घाटावर एका ठिकाणी बसलेली दिसत आहे. या फोटोमध्ये ईशा खूपच सुंदर दिसत आहे. ज्यामध्ये तिचा लूक पाहून सर्वजण तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

दाखवलं सगळ्यात वेगळं रूप 
नेहमीच बोल्ड स्टाईलमध्ये दिसणारी अभिनेत्री ईशा गुप्ताचा हा लूक पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. तिने हे फोटो आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत ईशा गुप्ताने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. 'काशी.'

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

काही दिवसांपूर्वी भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद घेतला
खरंतर, वेब सीरिजच्या रिलीजआधी ईशा गुप्ता भगवान भोलेनाथचा आशीर्वाद घेण्यासाठी वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिरात पोहोचली होती. ईशा गुप्ताने काशी विश्वनाथ मंदिरात भगवान भोलेनाथची पूजा करत मंदिराच्या आत एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री भगवान भोलेनाथची पूजा करताना दिसत आहे.

Read More